घरमुंबईDongriBuildingCollapse : ढिगाऱ्याखालून एका चिमुकल्याला वाचवले

DongriBuildingCollapse : ढिगाऱ्याखालून एका चिमुकल्याला वाचवले

Subscribe

मुंबईतील डोंगरी भागात कौसरबाग ही इमारत कोसळली. ढिगाऱ्याखाली ४५ ते ५० जण अडकल्याची भीती आहे. मदत आणि बचावकार्य सुरु करण्यात आलं असून एका बाळाला सुखरुप बाहेर काढण्यात अग्निशमन दल आण एनडीआरएफच्या पथकाला यश आलं आहे. ढिगाऱ्याखाली जी माणसं अडकली आहेत त्यामध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. एका बाळाला बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आलं आहे.

मृत्यूच्या ढिगाऱ्यातून चिमुकल्याला वाचवलं

मृत्यूच्या ढिगाऱ्यातून चिमुकल्याला वाचवलं

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಮಂಗಳವಾರ, ಜುಲೈ 16, 2019

- Advertisement -

DongriBuildingCollapse : ‘घटनेत १२ जाणांचा मृत्यू’ – राधाकृष्ण विखे पाटील

काय आहे घटना 

मुंबईच्या डोंगरी भागात कौसरबाग इमारत कोसळली आहे. या दुर्घटनेत अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. डोंगरीच्या बाबा गल्लीत चार मजली इमारत कोसळली आहे. इमारतीचा अर्धा भाग कोसळला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटानास्थळी दाखल झाले आहे. एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक नागरिक प्रयत्न करत होते. यानंतर अग्निशमन दलाचे आणि एनडीआरएफचे जवान घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरु केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -