घरताज्या घडामोडीठाण्यातील 'त्या' कंपनीतील कोरोना पॉझिटिव्ह कामगारांचा शोध सुरू

ठाण्यातील ‘त्या’ कंपनीतील कोरोना पॉझिटिव्ह कामगारांचा शोध सुरू

Subscribe

पालघरमधील एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून हा रूग्ण ठाण्यातील एका कंपनीत कामाला होता. त्यामुळे 'त्या' कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा शोध सुरु आहे.

पालघरमधील एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मात्र, तो रूग्ण ठाण्यातील एका कंपनीत कामाला होता. त्यामुळे ‘त्या’ कंपनीत काम करीत असलेल्या ११० कर्मचाऱ्यांची यादी मागवून ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे दिली आहे. त्यातील ५० कर्मचाऱ्यांना होम क्वांरटाईन करण्यत आले आहे.

ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात एका खासगी कंपनीत तो कामाला होता. १७ मार्चपर्यंत ही व्यक्ती कामाला येत होती. त्यामुळे कंपनीत काम करणाऱ्या ११० कामगारांची यादी महापौरांनी आरोग्य विभागाकडे दिली आहे. हे कामगार ठाण्याच्या विविध परिसरात राहत असून त्यांचा शोध सुरू आहे. महापालिकेचे आरोग्य अधिकारी हे मंगळवारी रात्रीपासून कामाला लागले असून हे कामगार ज्या ठिकाणी राहतात तेथील कामगारांची चौकशी करीत आहेत. या कामगारांमध्ये १० हायरिस्क आणि ४० लो रिस्क कामगार असून त्यांना होम क्वॉरंटाइन करुन त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्याबाबत महापालिकेचे कर्मचारी काम करीत आहेत. नागरिकांना महापौर नरेश म्हस्के यांनी आवाहन केले आहे की, नागरिकांनी घाबरुन जावू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये, फक्त घरी राहून स्वत:ची आणि कुटुंबियांची काळजी घ्या. तसेच प्रशासनास सहकार्य करा, असे आवाहन महापौर म्हस्के यांनी केले आहे.

- Advertisement -

हेही – अबब…बेस्टच्या बसेसमध्ये ‘सोशल डिस्टन्सिंग’चे वाजले तीन तेरा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -