घरCORONA UPDATECorona: ICMR कडून आयुर्वेद, होमिओपॅथी डॉक्टरांना दुय्यम वागणूक

Corona: ICMR कडून आयुर्वेद, होमिओपॅथी डॉक्टरांना दुय्यम वागणूक

Subscribe

कोविड- १९ चा सामना करण्यासाठी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिसिन रिसर्च (आयसीएमआर) तात्पुरत्या स्वरूपात दोन पदे भरण्यासाठी परिपत्रक काढले आहे. मात्र या परिपत्रकात त्यांनी होमिओपॅथी, आयुर्वेद या शास्त्रांचा गैरवैद्यकीय असा उल्लेख करत त्यांना दुय्यम वागणूक दिली आहे. त्यामुळे आयुर्वेद आणि होमिओपॅथी शास्त्रातील डॉक्टरांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. हे पत्रक तातडीने रद्द करून नवे परिपत्रक काढण्यात यावे अशा सूचना डॉक्टरांकडून करण्यात येत आहे.

भारतामध्ये अॅलोपॅथी, डेंटल, होमिओपॅथी, आयुर्वेद आणि युनानी या शास्त्रांचा समावेश वैद्यक शास्त्रात होतो. त्यानुसार अॅलोपॅथी, डेंटल, होमिओपॅथी, आयुर्वेद यांचे कौन्सिल ही स्थापन करण्यात आले आहे. सध्या देशात पसरलेल्या कोरोनाचा सामना करण्यासाठी सर्वच एकत्र येऊन काम करत आहेत. कोरोनासंदर्भात करण्यात येणाऱ्या कामासाठी आयसीएमआरने दोन पदांची भरती काढली आहे. यामध्ये एसएई कोऑर्डिनेटर कन्सल्टंट आणि प्रोजेक्ट अँड रेग्युलेटर कोऑर्डिनेटर या दोन पदांचा समावेश आहे. ही पद भरती वैद्यक आणि गैरवैद्यक अशा गटात करण्यात येणार आहे. मात्र वैद्यक गटात एमबीबीएस, पदव्युत्तर, डिप्लोमा, एमडी केलेल्या डॉक्टरांचा समावेश केला आहे. तर गैरवैद्यक गटामध्ये बीएएमएस, बीएचएमएस पदवीधारकांचा उल्लेख केला आहे. आयुर्वेद आणि होमिओपॅथी हे वैद्यक शास्त्राचा भाग असून भारतीय वैद्यक पद्धती म्हणून जगभरात प्रसिद्ध असतानाही आयसीएमआरकडून बीएएमएस, बीएचएमएस पदवीधारकांना गैरवैद्यकीय ठरवणे म्हणजे भारतीय उपचार पद्धतीला दुय्यम दर्जाचे समजण्याचा प्रकार आहे.

- Advertisement -

अॅलोपॅथीमध्ये कोरोनावर कोणतेही औषध नसताना होमिओपॅथीमध्ये कोरोनावर उपचार पद्धती अस्तित्त्वात आहे, असे असतानाही आयसीएमआरकडून होमिओपॅथी आणि आयुर्वेदाला दुय्यम दर्जाची वागणूक देण्यात येत असलेला प्रकार खेदजनक आहे, अशी प्रतिक्रिया डॉक्टरांकडून व्यक्त करण्यात येत आहे. आयसीएमआरने आपली ही चूक तातडीने दुरुस्त करावी व पदभरतीसंदर्भातील परिपत्रक नव्याने काढण्यात यावे असे आवाहन आयुर्वेद आणि होमिओपॅथी डॉक्टरांकडून करण्यात येत आहे.

- Advertisement -

बीएएमएस आणि बीएचएमएस पदवीधारकांचा उल्लेख गैरवैद्यक करणे चुकीचे आहे. देशातील प्राचीन शास्त्राकडे बघण्याचा हा दृष्टिकोन अयोग्य आहे. त्यामुळे आयसीएमआरने तातडीने आपली चूक सुधारावी.
– डॉ. आशुतोष गुप्ता, अध्यक्ष, महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन

जागतिक आरोग्य संघटनेच्या दडपणाखाली आयसीएमआरकडून देशात अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या आयुर्वेद आणि होमिओपॅथीला संपवण्याचा घाट घालण्यात येत आहे. अॅलोपॅथीमध्ये कोरोनावर अद्याप कोणतेही औषध शोधण्यात आले नाही, तर होमिओपॅथीमध्ये कोरोनाचा सामना करण्यासाठीची उपचार पद्धती अस्तित्त्वात असताना त्याकडे सरकारकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यातच कोरोनाच्या लढ्यातही आयुर्वेद आणि होमिओपॅथी डॉक्टरांना दुय्यम दर्जाची वागणूक देण्याचा प्रकार आयसीएमआरकडून करण्यात येत असल्याने आयुर्वेद आणि होमिओपॅथी डॉक्टरांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

आयुर्वेद आणि होमिओपॅथी हे आपल्या वैद्यकशास्त्राला संपवण्याचा प्रकार आहे. आयसीएमआरकडून हे जाणिवपूर्वक करण्यात येत आहे. हे योग्य नाही. केंद्र सरकारने हे सरकारने आपल्या स्तरावर हे मान्य करणे योग्य नाही. ही चूक तातडीने सुधारली पाहिजे.
– डॉ. अभय छेडा, मेडिकल डायरेक्टर, आरजू स्वाभिमान नागरिक समिती

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -