घरमुंबईशहापूरच्या डोंगर माथ्यांना चढणार हिरवा साज

शहापूरच्या डोंगर माथ्यांना चढणार हिरवा साज

Subscribe

वनविभागाकडून 19 लाख 50 हजार वृक्षांची लागवड

शहापूर वन विभागाच्या प्रादेशिक वनक्षेत्रात रोप लागवड म्हणून यंदा पावसाळ्याच्या मोसमात एकूण 19 लाख 50 हजार वृक्षांची लागवड नव्याने करण्यात आली आहे. यामुळे शहापूर तालुक्यातील घनदाट जंगलातील डोंगर माथ्यांंना आणखी नव्या हिरव्यागार वृक्षांचा साज चढणार आहे.

वनविभागाच्या शहापूर उपवनसंरक्षक कार्यालयाच्या अंतर्गत येणार्‍या एकूण 6 वनपरिक्षेत्रातील 23,50 हेक्टर वनजमिनीवर ही रोपवन लागवड करण्यात आल्याचे माहिती शहापूरचे उपवनसंरक्षक वसंत घुले यांनी दिली. पावसाळ्यादरम्यान ही लागवड केली असून यात 26 प्रजातींच्या वृक्षांचा समावेश आहे. यात आवळा, बांबू, करंज, सिताफळ, आपटा, चिंच, साग, खैर, बोर, जांभुळ, मोह, हिरडा, बेल, शिवन, कांचन आदी रोपांचा समावेश आहे. लागवड केलेल्या या सर्व वृक्षांची वनकर्मचार्‍यांन कडून योग्य अशी देखभाल केली जात असून राज्य सरकारच्या 33 कोटी वृक्ष लागवड संकल्पनेचाच हा एक भाग आहे, असे उपवनसंरक्षक वसंत घुले यांनी माहिती देताना सांगितले.

- Advertisement -

ही रोप लागवड भविष्यात पर्यवरणाचा समतोल राखण्यासाठी उपयुक्त ठरणार असून रोपांचे मोठ्या वृक्षांत रुपांतर झाल्यानंतर जंगल घनदाट होईल व डोंगरमाथे देखील हिरवेगार गार होतील. शहापूर वनराईला या नव्याने केलेल्या वृक्ष लागवडीने नवा साज चढणार आहे. ही लागवड फळास आली तर आणखी घनदाट असे हिरवेगार जंगल पाहण्यास मिळेल. यापूर्वी जंगलात पेटविले जाणारे वणवे, छुप्या पध्दतीने होणारी वृक्षतोड, अनियमित होणारा पाऊस, वाढते प्रदुषण यामुळे निसर्गाचा र्‍हास होऊन पर्यवरणाचा समतोल प्रचंड ढासळलेला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी दरवर्षी रोपवन लागवड केली जाते. यंदा झालेल्या रोपवन लागवडीमुळे शहापूर तालुक्यातील वनक्षेत्रास नवसंजीवनी प्राप्त होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -