घरमुंबईफटाके विक्रीवर विक्रेते समाधानी

फटाके विक्रीवर विक्रेते समाधानी

Subscribe

गेल्यावर्षीच्या तुलनेत फटाक्याची विक्री घटली

प्रतिनिधी: फटाके वाजविण्यासंदर्भात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचा यंदाच्या वर्षी फटाका विक्रीवर झाला. त्यामुळे मुंबईत यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी फटाके विक्री झाली. फटाक्यांसंदर्भाती होणारी जनजागृती तसेच कोर्टाचा हस्तक्षेप या कारणांमुळे बहुतांश फटाका विक्रेत्यांनी आधीच फटाके कमी प्रमाणात विक्रीसाठी खरेदी केले. त्यामुळे फटाका विक्रेत्यांचा तोटा कमी झाला, मात्र वाढत्या जनजागृती आणि कोर्टाच्या निर्णयानंतरही समाधानकारक फटाके विक्री झाल्याने फटाके विक्रेत्याकडून सुटकेचा निश्वास सोडला.

फटाके वाजवण्यासंदर्भात सुप्रीम कोर्टाने रात्री ८ ते १० वाजेपर्यंतच फटाके वाजविण्याची मुभा दिली. कोर्टाच्या या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कारवाईचा इशारा दिला होता. त्यामुळे मुंबईसह राज्यात अनेकांमध्ये फटाके वाजविण्यासंदर्भात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. याचेच पडसाद मुंबईतील फटाके विक्री करणार्‍या घाऊक आणि किरकोळ विक्रेत्यांवर झाल्याचे दिसून आले. अनेकांनी यंदा फटाके खरेदी करण्याकडे पाठ फिरवल्याचे चित्र दीपावली निमित्ताने दिसून आले, तर फटाके वाजविण्यासंदर्भात मुंबईतील अनेक शाळांनी विशेष मोहीम सुरु करीत ग्रीन दिवाळीचे संदेश विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यास सुरुवात केली, याचेही पडसाद फटाके विक्रीवर झाली. पण गेल्या दोन ते तीन दिवसांत फटाके प्रेमींनी फटाके खरेदीसाठी गर्दी करीत असल्याने फटाके विक्री किती प्रमाणात होते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. हा आकडा गेल्यावर्षीपेक्षा वाढलेला नसल्याची माहिती अनेक व्यापार्‍यांकडून देण्यात आली.

- Advertisement -

या पार्श्वभूमीवर मुंबईतील फटाके विक्रेत्यांकडे विचारणा केली असता, त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. यंदा फटाके विक्री कमी झाली आहे, हे खरे आहे. पण यंदा आम्ही गेल्यावर्षीच्या तुलनेत मालच कमी भरला होता. त्यामुळे तेवढ्या मोठ्या प्रमाणात तोटा झाला नाही. दरवर्षी लहान मुले मोठ्या प्रमाणात फटाके खरेदीसाठी येतात. यंदा मात्र तसा टे्रण्ड दिसला नाही. यंदा अनेक शाळांनी विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करताना शाळांमध्ये दिपोत्सवाचे आयोजन केले. अनेकांनी यंदा शाळेतच कंदील बनविण्याचे वर्ग भरविले. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये फटाके वाजविण्यापासून दोन हात लांब राहण्यासाठी अधिक पसंती दर्शविली आहे.

आम्ही कोर्टाच्या निर्णयाचा आदर करतो. एकीकडे फटाके व्यावसायिकांवर बंदीची कुर्‍हाड पडणार होती, अशा वेळी कोर्टाने फटाके फोडण्यासाठी वेळ मर्यादा देऊन सुवर्णमध्य काढला. त्यामुळे आमचे मोठे नुकसान वाचले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा किती नुकसान झाले हे अद्याप कळणार नाही. कारण यंदा प्रत्येकाने कमी प्रमाणात मालांची खरेदी केली होती. त्यामुळे आताच हा नुकसानीचा आकडा सांगणे कठीण आहे. पण मुंबईत विक्री कमी झाली हे मात्र नक्की.
– मिनीष मेहता, सचिव, मुंबई अ‍ॅण्ड ठाणे डिस्ट्रिक्ट फायर वर्क डिलर्स वेल्फअर असोशिएसन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -