ज्येष्ठ रंगभूषाकार पंढरी जुकर यांचे निधन

ज्येष्ठ रंगभूषाकार नारायण हरिश्चंद्र जुकर उर्फ 'पंढरीदादा' यांचे वयाच्या ८८ व्यावर्षी निधन.

Mumbai
senior makeup man pandhari zucker dies
ज्येष्ठ रंगभूषाकार पंढरी जुकर यांचे निधन

ज्येष्ठ रंगभूषाकार पंढरी जुकर यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले आहे. वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. पंढरीदादा जुकर यांचे खरे नाव ‘नारायण हरिश्चंद्र जुकर’, असे होते. मात्र, संपूर्ण चित्रपट आणि नाट्यसृष्टी त्यांना ‘पंढरीदादा’ या नावानेच ओळखत असे.

पंढरी जुकर यांच्याविषयी थोडक्यात

गेली ६५ वर्षे त्यांनी रंगमंच, मोठा आणि छोटा पडदा खऱ्या अर्थाने ‘रंगवणारे’ रंगभूषकार म्हणून पंढरीदादा जुकर यांना ओळखले जायचे. त्यांनी ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटांपासून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. चित्रपटसृष्टीत गेली तीन दशके मेकअप आर्टिस्टचे काम करणारे पंढरीदादांनी सुरूवातीच्या काळात प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेता व्ही.शांताराम यांचा मेक अप केला होता. रंगभूषेतल्या कारकिर्दीचा श्रीगणेशाच त्यांनी त्यांच्या चेहऱ्यापासून केला होता. तसेच ‘झनक झनक पायल बाजे’, ‘चित्रलेखा’ ‘ताजमहाल’, ‘नुर जहां’, ‘नील कमल’, ‘काला पत्थर’, ‘शोले’, ‘नागिन’, ‘मिस्टर इंडिया’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ अशा ५०० हून अधिक चित्रपटांमधील अभिनेत्यांना नवीन रंग दिला. त्यामुळे चित्रपटसृष्टीत नवीन आयाम प्रस्थापित झाले. तसेच व्ही. शांताराम यांच्या नावे महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारा ‘चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार २०१३’चा सन्मानपूर्वक पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.


हेही वाचा – कोस्टल रोडसाठी ६०० झाडांची कत्तल होणार