घरमुंबईतरुणींना एकट्यात गाठून विनयभंग; ‘सिरीयल मॉलेस्टर'ला २ वर्षांनी अटक

तरुणींना एकट्यात गाठून विनयभंग; ‘सिरीयल मॉलेस्टर’ला २ वर्षांनी अटक

Subscribe

पश्चिम उपनगरात विनयभंगाचे अनेक गुन्हे दाखल असून मागील दोन वर्षांपासून सातत्याने त्याचे कृत्य सुरु होते.

कॉलेज विद्यार्थिनी तसेच एकट्या दुकट्या तरुणींचा विनयभंग करणाऱ्या एका ‘ सिरीयल मॉलेस्टर’ ला अखेर जुहू परिसरातून अटक कऱण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध पश्चिम उपनगरात विनयभंगाचे अनेक गुन्हे दाखल असून मागील दोन वर्षांपासून सातत्याने त्याचे कृत्य सुरु होते. त्याने अनेक वेळा पोलिसांना चकवा देखील दिला आहे.

अनेक गुन्हे दाखल

नितीन भारद्वाज (३७) असे अटक कऱण्यात आलेल्या ‘ सिरीयल मॉलेस्टर’चे नाव असून तो आपल्या कुटुंबासह मालाड पश्चिम येथे राहण्यास आहे. नितीन हा इस्टेट एजंट असून चांगल्या घराण्यातील आहे. नितीन हा मोटारसायकल तर केव्हा मोटारीने पश्चिम उपनगरातील वांद्रे ते ओशिवरा दरम्यान कॉलेज परिसर आणि उच्चभ्रू वसाहत या ठिकाणी फिरत असे, व एकट्या दुकट्या विद्यार्थिनी, तरुणीला बघून आपले वाहन त्यांच्याजवळ थांबवत असे, त्यानंतर त्यांना पत्ता विचारण्याच्या निमित्ताने त्यांच्या सोबत अश्लील कृत्य करून दुरून त्यांना बघून अश्लील हावभाव करीत होता. मागील दोन वर्षांपासून त्याचा हा दररोजचा नित्यक्रम होता. या दोन वर्षात त्याच्या विरुद्ध पश्चिम उपनगरातील विविध पोलीस ठाण्यामध्ये अनेक गुन्ह्यामध्ये अनेक गुन्हे दाखल झाले होते.

- Advertisement -

सापळा रचून केले अटक

मागील दोन वर्षांपासून सुरु असलेल्या त्याच्या या कृत्यामुळे विद्यार्थी आणि महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. अखेर या विकृत ‘सिरीयल मॉलेस्टर’ला पकडण्यासाठी परिमंडळ ९ चे पोलीस उपायुक्ताने विशेष पथक केले होते. मागील ३ महिन्यापासून हे पथक ‘ सिरीयल मॉलेस्टर’ च्या मागावर होते. विशेष पथकाने त्याला पडण्यासाठी सीसीटीव्हीची ची मदतीने ४०० मोटारसायकल १०० पेक्षा अधिक मोटारी तपासण्यात आल्या मात्र तो मिळून येत नव्हता. अखेर पोलीसानी त्याची वेळ, ठिकाणे बघून अखेर विविध ठिकाणी सापळा रचण्यात आला होता.

अखेर जुहू पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ‘सिरीयल मॉलेस्टर’ नितीनला अटक करण्यात आले, अशी माहिती जुहू पोलीस ठाण्याचे वपोनि. पंढरीनाथ व्हावळ यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -