नोकरानेच लुटले मालकाला, १३ लाखांचा घातला गंडा

गोडाऊनमधील माल कमी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी या दोघांकडे यासंदर्भात विचारपूस केली. त्यावेळी संतापलेल्या सरफराज शेख आणि आसिफ खान यांनी ढोलानी यांना मारण्याची धमकी दिली

Mumbai
Thief
(फोटो प्रातिनिधीक आहे.)

मालकाचा विश्वास संपादन करुन नोकराने मालकाला लुटल्याचा धक्कादायक प्रकार कल्याण येथे घडला आहे. या मालकाला चक्क १२ लाख ७० हजार ५३१ रुपयांचा गंडा घातला आहे. या प्रकरणी महात्मा फुले पोलीस स्टेशनमध्ये सरफराज शेख आणि आसिफ शेख या दोघांविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यामुळे घरी नोकर ठेवताना सावधान!

वाचा- मोठ्या भावाची हत्या करून रचला चोरीचा बनाव

नेमकं प्रकरण काय?

मुळचे अहमदाबादचे राजकुमार ढोलानी यांचे कल्याणच्या वल्लीपीर रोडवरील सर्वोदय बिल्डींग येथे टीव्हीचे गोडाऊन आहे. या गोडाऊनमध्ये सरफराज शेख आणि आसिफ खान काम करत होते. एप्रिल महिन्यापासून ते या ठिकाणी काम करत होते. सरफराज जोगेश्वरीचा तर आसिफ हा कल्याण येथे राहणारा आहे. या दोघांनी ढोलानी यांच्या नकळत गोडाऊनमधील तब्बल १३ लाखाचे टीव्ही परस्पर विकले.

वाचा- अरेच्च्या! पोलिसाच्या घरातच चोरी

मालकाच्या निदर्शनास आली गोष्ट

गोडाऊनमधील माल कमी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी या दोघांकडे यासंदर्भात विचारपूस केली. त्यावेळी संतापलेल्या सरफराज शेख आणि आसिफ खान यांनी ढोलानी यांना मारण्याची धमकी दिली. त्यामुळे हा अपहार यांनीच केला असे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी या दोघांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. सध्या या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here