घरमुंबईपाणी टंचाईवर वेळापत्रक बदलाचा तोडगा

पाणी टंचाईवर वेळापत्रक बदलाचा तोडगा

Subscribe

 बदलापूर शहरात लागू असलेल्या सलग तीस तासांच्या पाणीकपातीमुळे चार दिवस पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता. त्यावर अखेर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने वेळापत्रक बदलाचा तोडगा काढला आहे. आता शहरात दोन भागात सलग तीस तासांऐवजी सोमवार आणि शुक्रवारी १५-१५ तास पाणी कपात केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.

बदलापूर शहराला पाणी पुरवठा करणार्‍या उल्हास नदीची पाणी पातळी खालावल्याने जानेवारीच्या दुसर्‍या आठवड्यापासून सलग ३० तासांची पाणी कपात लागू करण्यात आली होती. रविवार ते मंगळवार सलग ३० तासांच्या पाणीकपातीनंतर बुधवारी आणि गुरूवारपर्यंत पाणी कमी दाबाने मिळत होते. त्यामुळे नागरिकांत संतापाचे वातावरण होते. या काळात चढ्या दराने टँकर विकत घ्यावे लागत असल्याने संतापात भर पडत होती. याबाबत शिवसेनेचे नगरसेवक शैलेश वडनेरे यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे बदलापूर शहर दुष्काळग्रस्त जाहीर करून टँकरने मोफत पाणीपुरवठा करण्याची मागणी केली होती. याची दखल घेत जीवन प्राधिकरणाने सलग ३० तासांची कपात रद्द केली आहे. त्याऐवजी आता शहरात सोमवार आणि शुक्रवार अशी १५ – १५ तासांची कपात केली जाणार आहे.

- Advertisement -

गुरूवारी रात्री ९ वाजल्यापासून शुक्रवारी दुपारी १२ वाजेपर्यंत तर सोमवारी रात्री ९ वाजल्यापासून मंगळवारी दुपारी १२ वाजेपर्यंत ही कपात केली जाणार आहे. त्यातही शहराचे दोन गटात विभाजन करण्यात आले असून एका भागाचे सोमवारी तर दुसर्‍या भागाचे शुक्रवारी पाणी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना फक्त एकच दिवस पाणी कपातीला सामोरे जावे लागणार आहे. येत्या शुक्रवारपासून ही पद्धत अवलंबली जाणार आहे. असे असले तरीही बदलापूरला जादा पाणी देऊन शहरातील पाणी गळती थांबवून पाणी कपात पूर्णपणे रद्द करण्याची मागणी नगरसेवक शैलेश वडनेरे यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -