Monday, August 10, 2020
Mumbai
28 C
घर महामुंबई मिनीडोअर अपघातात ७ महिला प्रवासी जखमी

मिनीडोअर अपघातात ७ महिला प्रवासी जखमी

अलिबाग-रोहे मार्गावरील दुर्घटना

Mumbai

मिनीडोअर उलटून 7 महिला प्रवासी जखमी झाल्या. त्यात एका गरोदर महिलेचा समवेश आहे. अलिबाग-रोहे मार्गावर गुरुवारी मल्याण फाटा येथे हा अपघात घडला. या महिला खानाव येथून मिनीडोअरमधून आंदोशी येथे जात होत्या. वाटेतील खड्डा चुकविताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने मिनीडोअर उलटली. या अपघातात भारती गायकर, वंदना गायकर, जयश्री गायकर, शारदा गायकर, निकिता गायकर, सानिका गायकर आणि सुनंदा गायकर (सर्व राहणार खानाव) जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर अलिबाग येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघाताची माहिती मिळताच खानाव ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना त्यांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे हा अपघात झाला असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेसचे नेते अनंत गोंधळी यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.