घरमुंबईकळवा; पाण्यासाठी जीवघेणी रेल्वे क्रॉसिंग!

कळवा; पाण्यासाठी जीवघेणी रेल्वे क्रॉसिंग!

Subscribe

कळवावासियांना पाण्याच्या भीषण समस्येला तोंड द्यावे लागत आहे. तसेच पाण्यासाठी वणवण देखील करावी लागत आहे.

कळवा परिसरात अनेक महिन्यांपासून पाण्याची समस्या भेडसावत आहे. वाढत्या वस्तीमुळे पाण्याचे समप्रमाणात वितरण होत नाही. अपुऱ्या पाणी पुरवठयामुळे इथल्या रहिवाशांना पाणी मिळवण्यासाठी रेल्वे रूळ क्रॉसिंग करावा लागत आहे. त्यामुळे कळवावासियांमध्ये पाण्यासाठी जीवघेणी क्रॉसिंग करावी लागत असल्यानेतीव्र नाराजी व्यक्त होत आहे. नागरिकांना २४ तास पाणी देण्याची घोषणा करणाऱ्या ठाणे महापालिकेचे पितळ उघडे पडले आहे. २४ तास दूरच राहिले, अगोदर आठवडाभर नियमित आणि पुरेसे पाणी द्या, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

रहिवाशांची पाण्यासाठी वणवण

कळवा पूर्व परिसरातील न्यू शिवाजी नगर, ठाकूर पाडा, तलाव पाडा, सम्राट अशोक नगर, घोलाई नगर परिसरातील हजारो रहिवाशांना कित्येक वर्षांपासून पाण्याच्या भीषण समस्येला तोंड द्यावे लागत आहे. घोलाई नगर परिसरात पाण्याची टाकी असून त्यातून आजूबाजूच्या परिसरात पाणी पुरवठा होत असतो. सर्वात शेवटी उरले सुरलेले पाणी, या परिसरात पोहचते. अपुरा पाणी पुरवठा होत असल्याने रहिवाशांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे, असे इथल्या रहिवाशांचे म्हणणे आहे. वाढती लोकवस्ती आणि कमी दाबाने होणारा पाणी पुरवठा यामुळे रहिवाशांना दररोज सकाळ संध्याकाळी रेल्वे रूळ क्रॉस करून पलिकडच्या परिसरातून पाणी आणावे लागत आहे. लहान मुले, तरूण, महिलांना डोक्यावर खांद्यावर हंडे उचलून पाणी भरावे लागत आहे.

- Advertisement -

पाण्यासाठी जीवघेणी कसरत

काही वर्षांपूर्वी रेल्वे रूळ क्रॉस करत असताना एका ३ वर्षीय मुलीला जीव गमवावा लागल्याची घटना घडली आहे. मात्र त्यानंतरही प्रशासनाचे डोळे उघडले नाही. रहिवाशांची जीवघेणी कसरत सुरुच आहे. याच परिसरात स्थानिक नगरसेविका प्रियांका पाटील यांनी पाण्याच्या टाकीसाठी पालिकेत पाठपुरावा केलेला आहे. सदर नवी टाकी तयार होईपर्यंत रहिवाशांना त्रास होणार आहे.

- Advertisement -

महिलांनी मांडला समस्यांचा पाढा

सद्या कळवा रेल्वे शेडच्या परिसरातून पिण्याचे पाणी उपलब्ध होत असून त्यासाठी ही जीवघेणी रेल्वे क्रॉसिंग करावी लागत आहे, असे स्थानिक रहिवाशांनी सांगितले. पाण्याची मशीन लावल्याशिवाय पाणी येत नाही अनेकवेळा आठवडाभरही पाणी नसते उन्हाळयाच्या दिवसात खूपच हाल होतात, असा समस्यांचा पाढा इथला महिलांनी मांडला. त्यामुळे कळवावासियांना आता तरी नियमित आणि पुरेसा पाणी पुरवठा होईल का? असाच सवाल संतप्त रहिवाशांकडून उपस्थित होत आहे.


हेही वाचा – पोलिसांच्या घराचा प्रश्न लवकर मार्गी लागणार – गृहमंत्री शिंदे


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -