घरमुंबईललिता आता 'ललित'च्या वाटेवर, शस्त्रक्रियेचा पहिला टप्पा पार

ललिता आता ‘ललित’च्या वाटेवर, शस्त्रक्रियेचा पहिला टप्पा पार

Subscribe

बीड जिल्ह्यातील पोलिस कॉन्स्टेबल ललिता साळवे यांच्यावर लिंग परिवर्तनाची पहिली यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. सकाळी ८.३० वाजल्यापासून या शस्त्रक्रियेला सुरुवात झाली. तब्बल ४ तासांच्या शस्त्रेक्रियेनंतर आता ललिताचा ‘ललित’ झाला. सेंट जॉर्ज हॉस्पिटलच्या प्लॉस्टिक सजॅरी विभागाचे तज्ज्ञ डॉ. रजत कपूर आणि त्यांच्या टीमनं ही शस्त्रक्रिया केली. ही शस्त्रक्रिया करण्यासाठी आठ जणांची टीम नेमण्यात आली होती. यात ४ सर्जन डॉक्टर, ४ भूलतज्ज्ञ आणि परिचारिकांची टीम होती.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, “लिंग बदल शस्त्रक्रिया करताना शरीर सुन्न करुनच शस्त्रक्रिया करावी लागते. सुरुवातीला ही शस्त्रक्रिया करताना ललिताचे संपूर्ण शरीर इंजेक्शनने सुन्न करण्यात आले. ही शस्त्रक्रिया करण्यासाठी खासगी रुग्णालयात दीड लाख रुपये खर्च येतो. मात्र सरकारी रुग्णालयात हा खर्च ४० ते ५० हजार आहे. ललिताया शस्त्रक्रियेसाठी रुग्णालय प्रशासन कुटुंबाकडून एकही पैसे घेणार नाही.”

- Advertisement -

लिंग परिवर्तनाच्या शस्त्रक्रियेत ‘या’ तिघांची महत्त्वाची कामगिरी 

डावीकडून डॉ. मधुकर गायकवाड, डॉ. रजत कपूर आणि डॉ.‌ संतोष गीते

“ललिता हिची स्त्री प्रजननक्षमता विकसित झाली नव्हती. शिवाय, स्तन ही विकसित नव्हते. पुरूष हॉर्मान्स तिच्यात जास्त प्रमाणात होते. प्रथम पुरूषाप्रमाणे लघवी करता यावी यासाठी एक ट्यूब टाकण्यात आली. पुढील शस्त्रक्रिया सहा महिन्यांनी केल्या जातील. त्यानंतर केसांवर शस्त्रक्रिया करून त्यांच्या इच्छेनुसार आकार दिला जाईल आणि सहा महिन्यांनी दुसरी शस्त्रक्रिया केली जाईल. ललितचं वय कमी असल्यानं या शस्त्रक्रियेनंतर तो लवकरच स्थिर होईल. त्यानंतर तो सर्वसामान्य व्यक्ती प्रमाणे आयुष्य जगू शकतो. अशा शस्त्रक्रियेमध्ये अनेकदा त्वचा विकार होण्याची शक्यता असते. रक्तदाब वाढू शकतो. याकरता काळजी घेण्यात आली आहे. मुळात या शस्त्रक्रियेद्वारे ललिताचा आत्मविश्वास वाढवणे हा मुळ हेतू होता. आता तीन महिन्यानंतर पुरुषाप्रमाणे शुक्राणू तयार होतात का ? हे पाहिले जाईल, त्यानंतर पुढील उपचार दिले जातील.”
– डॉ. रजत कपूर, प्लॉस्टिक सर्जरी विभाग तज्ज्ञ

- Advertisement -

“या रुग्णालयात लिंग परिवर्तनाची ही पहिली शस्त्रक्रिया आहे. या शस्त्रक्रियेनंतर अनेकांनी फोन करून शस्त्रक्रिया करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अनेकदा निसर्गाच्या विरोधात जाऊन एखादी गोष्ट आपण करतो तेव्हा भीती असते. त्याचप्रमाणे अशा शस्त्रक्रियेनंतर रुग्णांने स्वतः काळजी घेणे गरजेचे असते. यात वजन वस्तू उचलू नये तसेच ताप, पोटदुखी डायरीया झाल्यासं आजार अंगावर न काढता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, ही काळजी रुग्णाने घ्यावी.”
– डॉ. मधुकर गायकवाड, वैद्यकीय अधीक्षक

“हा पेशंट एकदम फिट होता. त्यामुळे जास्त काही त्रास झाला नाही. सर्जरी नॉर्मल होती‌. वैद्यकीय चाचण्या ही चांगल्या होत्या. त्याच्या पूर्ण शरीराला अॅनेस्थेशिया देण्यात आला होता.”
– डॉ.‌संतोष गिते , भूलतज्ज्ञ

Rashmi Manehttps://www.mymahanagar.com/author/rashmi/
गेल्या ११ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय. प्रिंट, डिजीटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. मनोरंजन, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -