ठाण्यात लैंगिक छळाच्या आरोपीची आत्महत्या

अभिषेकसोबत काम करणाऱ्या महिला सहकारीने अश्लील आणि धमकीचे मेसेज पाठवून लैंगिक छळ केल्याप्रकरणी त्याला अटक झाली होती.

Thane
Explosion in this feature phone's battery 60 year man died

ठाण्यामध्ये एका खासगी कंपनीतील व्यवस्थापकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्या केलेल्या व्यक्तीवर एका महिलेने लैंगिक छळ केल्याचा आरोप केला आहे. अभिषेक शर्मा असं या व्यक्तीचे नाव आहे. अभिषेकने राहत असलेल्या बिल्डिंगच्या २५ व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली आहे. अभिषेकवर तो ज्या कंपनीमध्ये काम करत होता त्याच कंपनीमध्ये काम करणाऱ्या एका महिला सहकारीने अभिषेकने लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी त्याला पोलिसांनी अटक केली होती. जामिनावर सुटका झाल्यानंतर त्याने आत्महत्या केली आहे.

सुसाईड नोटमध्ये म्हटलं असं ?

ठाण्यातील कोलशेत परिसरात अभिषेक शर्मा कुटुंबियांसोबत राहत होता. घणसोली येथे एका मोठ्या कंपनीत तो व्यवस्थापक म्हणून काम करत होता. अभिषेकसोबत काम करणाऱ्या महिला सहकारीने अश्लील आणि धमकीचे मेसेज पाठवून लैंगिक छळ केल्याप्रकरणी त्याला अटक झाली होती. जामीनावर सुटका झाल्यानंतर त्याने २५ व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी अभिषेकने सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यामध्ये त्याने आत्महत्येला तक्रार करणारी महिला जबाबदार असल्याचे म्हटले आहे. अभिषेकने आत्महत्यापूर्वी लिहलेल्या चिठ्ठीवरुन पोलीस तपास सुरु आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here