घरमुंबई१९ वर्षाच्या तरुणीवर लैगिंक अत्याचार करुन प्रियकर फरारी

१९ वर्षाच्या तरुणीवर लैगिंक अत्याचार करुन प्रियकर फरारी

Subscribe

प्रियकराने लैंगिक अत्याचार करुन तिचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली.

वांद्रे येथील १९ वर्षांच्या तरुणीवर प्रियकराने लैंगिक अत्याचार करुन तो फरार झाला आहे. प्रियकराने त्या तरुणीवर लैगिंक अत्याचार करुन तिचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली आणि तिच्याकडून खंडणी मागितली. या विरोधात वांद्रे पोलीसात पिडीत तरुणीने तिच्या प्रियकराची तक्रार केली आहे. पिडीत तरुणी ही सांताक्रूज येथे राहणारी आहे. तसेच ती एका खाजगी कंपनीत कामाला आहे. आरोपी प्रियकर आणि ती एका गावातले रहिवाशी आहेत. त्यामुळे त्या दोघांचा परिचय होता. ते दोघेही उत्तर प्रदेश येथील आहे. जेव्हा ती नोव्हेंबर महिन्यात उत्तर प्रदेशात गेली तेव्हा त्या आरोपीसोबत तिची मैत्री झाली. या मैत्रीदरम्यान त्या दोघांनी मोबाईल नंबर एकमेकांना शेअर केले होते. जेव्हा ती मुंबईला परतली तेव्हा आरोपीने तिला मुंबईला भेटायला येण्याचे सांगितले होते. आरोपी एप्रिल महिन्यात उत्तर प्रदेशहून मुंबईत तिला भेटण्यासाठी आला होता.

आरोपी मुंबईत आल्यानंतर त्याने तिला फोन करुन बॅण्डस्टॅण्डजवळ बोलवले. तेव्हा तिला लग्नाची मागणी घातली आणि त्यानंतर त्याने तिथेच तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या सर्वाचा व्हिडिओ त्याने केला होता. काही दिवसांनी आरोपीने तिला तो व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करु अशी धमकी दिली. त्याने तिच्यावर एप्रिल महिन्यात चार वेळा लैंगिक अत्याचार केला. आरोपीकडे असलेला तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करु नये म्हणून त्याने तिच्याकडे पैसे मागितले. तरुणीने आपली बदनामी होऊ नये म्हणून तिने त्याला पंधरा हजार रुपये दिले आणि सोन्याचे कानातले दिले. हे सगळं घेऊन आरोपी उत्तर प्रदेशात पळून गेला.

- Advertisement -

या सर्व प्रकरणामुळे त्या तरुणीची मानसिक अवस्था खचली होती. तिला या अवस्थेत पाहून पालकांनी तिची विचारपूस केली. तेव्हा तिने सर्व घडलेली घटना पालकांना सांगितली. त्यानंतर तिने आरोपीच्या विरोधात वाकोला पोलिसांत तक्रार केली. पण हे सर्व प्रकरण बॅण्डस्टॅण्ड येथे घडलं होतं. त्यामुळे या गुन्हाच्या तपासाची जबाबदारी वांद्रे पोलीस यांच्याकडे करण्यात आली आहे. वांद्रे पोलिसांचे एक विशेष पथक उत्तर प्रदेश येथे पाठवण्यात आले आहे. आरोपीला मुंबईत चौकशीसाठी आणले जाईल, असे पोलिसांनी सांगितले. आरोपीच्या विरुद्ध बलात्कारासह खंडणीचा गुन्हा नोंदविला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -