शबाना आझमी यांच्या ड्रायव्हरवर गुन्हा दाखल

Mumbai
Shabana Azmi car accident: FIR lodged against her driver for rash driving
शबाना आझमी यांच्या ड्रायव्हरवर गुन्हा दाखल

शनिवारी मुंबई-पुणे महामार्गावर खालापूर टोलनाक्याजवळ अभिनेत्री शबाना आझमी यांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात त्या जखमी झाल्यामुळे त्यांना तातडीने एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना कोकिलाबेन रुग्णालयात हलवण्यात आलं. आता शबाना आझमी यांची प्रकृती स्थिर असल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी आता शबाना आझामी यांच्या वाहन चालकाविरोधात ट्रक चालकाने तक्रार दाखल केली आहे. या चालकाचे नावं अमलेश योगेंद्र कामत असून अपघातात आझमी यांच्या गाडीसह ट्रकचही नुकसान झालं असल्यामुळे चालकांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पुण्याच्या दिशेने जात असताना मुंबई-पुणे महामार्गावर एका ट्रकला मागून धडक दिल्यामुळे हा अपघात घडला. यावेळी कारमध्ये शबाना आझमी, त्यांचे पती गीतकार जावेद अख्तर आणि वाहन चालक असे तीघेजण होते. या अपघातात जावेद अख्तर हे जखमी नसल्याची माहिती समोर आली होती.

या घटनेनंतर अनेक दिग्गजांनी सोशल मीडियावरद्वारे शबाना आझमी यांची प्रकृती ठिक होण्यासाठी प्रार्थना केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘त्या लवकर बऱ्या होण्यासाठी मी प्रार्थना करतो’ अशाप्रकारेचं ट्विट केलं होत.


हेही वाचा – उत्तर प्रदेशची पारुल चौधरी अर्धमॅरेथॉनमध्ये प्रथम