घरमुंबईशरद पवारांनी दाऊदचे सरेंडर नाकारले; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप

शरद पवारांनी दाऊदचे सरेंडर नाकारले; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप

Subscribe

परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दाऊदची मागणी करणे दुर्दैवी असल्याचे वक्तव्य भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. राम जेठमलानींनी शरद पवारांना सांगितलं होतं की, दाऊद सरेंडर व्हायला तयार होता. मात्र शरद पवारांनी तत्कालीन पंतप्रधानांना ही माहिती दिली होती का? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. दाऊद सारखा गुन्हेगार सरेंडर येतो, तेव्हा त्यांनी ही माहिती पंतप्रधानांना दिली का? याचा खुलासा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. शरद पवार त्यावेळी मुख्यमंत्री होते असे देखील त्यांनी सांगितेल आहे.

पवारांनी दुर्लक्ष केले

१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट आणि दंगलीचा मास्टर माईंड असलेल्या दाऊदला भारतात द्या अशी भीक मागणाऱ्यांनी यापूर्वी आलेली संघी गमावली असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ज्येष्ठ वकील राम जेठमलाणी यांनी दाऊद प्रत्यार्पण करायला तयार आहे आणि तो न्यायालयीन प्रक्रियेत देखील सहभागी व्हायला तयार असल्याचा प्रस्ताव तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांना दिला होता. मात्र शरद पवार यांनी या प्रस्तावाकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. तसंच या निर्णयात यूपीए सरकार देखील सहभागी असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

दाऊदला द्याची भीक मागितली जातेय

दाऊद समर्पण करायला तयार होता तर शरद पवारांनी त्याचे आत्मसमर्पण करुन न्यायालीयन प्रक्रियेत सहभागी का करुन घेतले नाही. याचा खुलासा होणे आवश्यक आहे. तसच ज्यावेळी हे उघड झाले त्यावेळी २०१५ साली पंतप्रधान नरेंद्र मोदींचे म्हणजे भाजपचे सरकार होते. मग त्यांनी सुध्दा यावेळी दाऊदला आणण्यासाठी प्रयत्न का केले नाहीत, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. आज मात्र दाऊदला भारताला द्या अशी भीक मागितली जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हे सरकार मिलीभगत आहे

दाऊद जेव्हा सरेंडर करायला तयार होतो तेव्हा शरद पवारांनी कुठल्या अधिकाराने दाऊदचं सरेंडर नाकारलं? हे सगळं माहीत असताना मोदी शरद पवारांच्या घरी का जातात याचा खुलासा व्हायला हवा. हे मिलीभगत सरकार असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

- Advertisement -

दाऊदचे सरेंडर का नाकारले?

दोन वेळा दाऊदच्या सरेंडरचा प्रस्ताव होता. पहिला प्रस्ताव १९९३ मध्ये आला होता. आता मंत्री म्हणतात दाऊद पाहिजे म्हणजे आपण त्याच्याकडे भिका मागितल्या सारखं आहे. तेव्हापासून आत्तापर्यंत जे जे पंतप्रधान झाले, त्यांनी याचा खुलासा करावा. थर्ड डिग्री मला वापरू नये, एवढीच त्याची अट होती. तरी त्याला का सरेंडर करून घेतलं नाही? शरद पवारांनी कुणाला विचारून दाऊदचं सरेंडर नाकारलं, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -