घरमुंबईईव्हीएम नाहीच, 'हा' खरा प्रॉब्लेम - शरद पवार

ईव्हीएम नाहीच, ‘हा’ खरा प्रॉब्लेम – शरद पवार

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ईव्हीएमवर नवी भूमिका मांडली असून खरी गडबड मतमोजणी अधिकाऱ्यांच्या पातळीवर झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.

लोकसभा निवडणुकांचे निकाल लागण्याअगोदर आणि निकाल लागल्यानंतर देखील प्रचारापेक्षाही जास्त चर्चा होती ती ईव्हीएम घोटाळ्यांची. विरोधकांनी यावरून चांगलंच रान उठवलं होतं. विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ईव्हीएमसंदर्भात केलेल्या वक्तव्याने चांगलीच राळ उडवून दिली होती. मात्र, आता ईव्हीएमची समस्या नसल्याचं मत शरद पवारांनी मांडलं आहे. ‘खरी अडचण ईव्हीएम किंवा व्हीव्हीपॅटची नसून निवडणूक अधिकाऱ्यांनीच मतमोजणी करताना गडबड केली’, असा संशय शरद पवारांनी व्यक्त केला आहे. मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या २०व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना शरद पवारांनी ही भूमिका मांडली आहे. त्यामुळे त्यांच्या या नवीन भूमिकेमुळे नवी चर्चा आणि नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

खरी गडबड तिसऱ्याच ठिकाणी!

कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांनी ईव्हीएम घोटाळ्याविषयी आपलं मत मांडलं. ते म्हणाले, ‘लोकसभा निवडणुकांमध्ये वापरलेल्या ईव्हीएमबद्दल आता काहीही शंका नाही. त्याबद्दल मी तज्ज्ञांशी बोललो आहे. दोन ठिकाणी त्यासंदर्भात आपण चौकशी केली केली. त्यामुळे खरी गडबड ही तिसऱ्या ठिकाणी म्हणजेच निवडणूक अधिकाऱ्याच्या पातळीवर झाली आहे. त्याबद्दल मी दिल्लीला जाऊन बैठक घेणार आहे’. दरम्यान, शरद पवारांच्या या भूमिकेमुळे आता राजकीय चर्चांना सुरुवात झाली आहे.

- Advertisement -


हेही वाचा – बारामतीला जाणारे पाणी बंद; शरद पवारांची संतप्त प्रतिक्रिया

‘..आणि पंतप्रधान गुहेत जाऊन बसलेत!’

यावेळी ईव्हीएमसोबतच इतरही अनेक मुद्द्यांवर शरद पवारांनी भूमिका मांडली. ‘संसदेत यावेळी भगवे विचार मांडणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. त्यातही गंभीर खटले असणाऱ्यांची संख्या अधिक आहे. हे गंभीर आहे’, असं म्हणत त्यांनी साध्वी प्रज्ञासिंह यांच्यावर टीका केली. तर, ‘विज्ञानाच्या आधारावर आधुनिक विचार केला जातो. पण आपले पंतप्रधान थेट गुहेत जाऊन बसले’, असं सांगत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर देखील निशाणा साधला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या २०व्या स्थापना दिनानिमित्त मुंबईत जलदिंडी काढण्यात आली होती. ‘ही जलदिंडी प्रतिकात्मक असून पाण्याचं महत्त्व सांगणारी आहे’, असं शरद पवार यावेळी म्हणाले.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -