शरद पवारच ‘जाणता राजा’; घाटकोपरमध्ये झळकले पोस्टर्स

राष्ट्रवादी काँग्रेसच्या समर्थकांनी शरद पवारच 'जाणता राजा' असल्याचे पोस्टर्स लावले आहेत.

Mumbai
sharad pawar janta raja poster in mumbai by ncp supporters
शरद पवारच 'जाणता राजा'

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना करणारे ‘आज के शिवाजी – नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरुन राजकारण चांगलेच तापले आहे. या पुस्तकावर चहुबाजूंनी टीका होत असतानाच पुण्यात मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत उदयनराजे भोसले यांनी शिवसेनेवर अनेक आरोप केले. त्यात ते असे, देखील म्हणाले होते की, ‘जाणता राजा फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज आहेत. ३५० वर्षांनंतरही शिवाजी महाराजांचे नाव काढले तरी अंगावर शहारा आणि चैतन्य निर्माण होते. आपण त्यांचा विचार आचरणात आणण्याचा प्रयत्न करू शकतो, अनुकरण करू शकतो. पण, शिवाजी महाराज कोणी होऊ शकत नाही.’, असं म्हणत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना अप्रत्यक्ष टोला लगावला होता. त्यानंतर, आज घाटकोपरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या समर्थकांनी शरद पवारच ‘जाणता राजा’ असल्याचे पोस्टर्स लावले आहेत.

कोणी लावले पोस्टर्स

घाटकोपरमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष नितीन देशमुख यांनी पोस्टर्स लावले असून या पोस्टर्सवर शरद पवारच ‘जाणाता राजा’ असे देखील लिहिले आहे. ‘आपापली राजकीय विचारसरणी निश्चित जोपासा, पण ज्या नेतृत्त्वामुळे महाराष्ट्र जगात ओळखला जातो त्या नेतृत्त्वावर अल्पमाहिती, अल्पज्ञानातून शिंतोडे उडवू नका. शरद पवार साहेब आम्हा तरुणांचे कालही जाणता राजा होते, आजही जाणता राजा आहेत आणि भविष्यातही जाणता राजा राहणारच’, या आशयाचे पोस्टर्स लावून राष्ट्रवादीने विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे.


हेही वाचा – रात्री डोअरबेल वाजवून पळणाऱ्या माथेफिरुला कांजूरमार्ग येथे अटक