घरमुंबईराष्ट्रवादीच्या 'आउट गोइंग'चा 'जाणत्या राजा'लाही धसका

राष्ट्रवादीच्या ‘आउट गोइंग’चा ‘जाणत्या राजा’लाही धसका

Subscribe

सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार आउट गोइंगसुरू असून, याचा धसका खुद्द जाणता राजा म्हणजेच पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी घेतला की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. खुद्द शरद पवार यांनी पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला तब्येत बरी नसताना हजेरी लावल्याचे पहायला मिळाले. हर्षवर्धन पाटील यांच्या ‘विधानगाथा’ या पुस्तकाचे प्रकाशन आज पार पडले. या पुस्तक प्रकाशनला शरद पवार उपस्थित राहिले होते. मात्र आपण या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित राहू शकणार की नाही? याची शंका नव्हती. पण सध्याची राजकीय परिस्थिती पाहता मला या प्रकाशनाला हजर रहावे लागले, असे पवार खुद्द मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत म्हणाले.

नेमकं काय म्हणाले शरद पवार?

या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमला मला यायला जमेल की नाही अशी शंका होती. कारण काल रात्री माझ्या जिभेचे आणि गळ्याचे ऑपरेशन झाले. डॉक्टरांना सांगितले बोलू नका म्हणून. पण सध्याचे महाराष्ट्राचे वातावरण बघितले आणि मी या कार्यक्रमाला गेलो नाही तर पत्रकार छापतील की मी गिरीश महाजन यांच्यासोबत अमित शहा यांना भेटायला गेलो असे सांगत शरद पवार यांनी सुरू असलेल्या आउट गोइंगवर अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली.

- Advertisement -

हेही वाचा – हल्ली कोण कोणत्या पक्षात आहे हे देखील कळत नाही – मुख्यमंत्री

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -