घरमुंबईकॅप्टनला घरी बसवून, शिवसेना संपवण्याचा पवारांचा डाव

कॅप्टनला घरी बसवून, शिवसेना संपवण्याचा पवारांचा डाव

Subscribe

भाजपच्या जेष्ठ नेत्याची सरकारच्या अपयशावर टीका

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उल्लेख शरद पवारांकडून कॅप्टन असा होतो. पण कॅप्टनला राज्यात भारतात फिरू दिले जात नाही. खुद्द शरद पवार मात्र इतक्या वयातही संपुर्ण राज्यात दौरे करत आहेत. या दौऱ्यांमागे फक्त एकच हेतू आहे, ते म्हणजे शिवसेना संपवणे. शिवसेना नामशेष करतानाच राष्ट्रवादीची ताकद कशी वाढेल असाही सुप्त उद्देश त्यांनी ठेवला आहे. माजी मंत्री आणि भाजपचे जेष्ठ नेते शिवाजी कर्डीले यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. शरद पवारांना सेना संपवायची आहे, म्हणूनच त्यांच्याकडून हे प्रयत्न सुरू आहेत असाही आरोप त्यांनी यावेळी केला.

सरकारच अपयश हे जनताच सांगत आहे, त्याबाबत मला वेगळ सांगायची गरज नाही. कोरोनाला रोखण्यात राज्य सरकार सफशेल अपयशी ठरलेल आहे. राज्यातील अनेक भागात रूग्णांसाठी बेड नाहीत, ऑक्सिजन पुरवठ्याची सोय नाही, औषधे मिळत नाहीत अशी अवस्था आहे. परंतु दुसरीकडे लाखो रूपयांची बिले भरण्याची वेळ राज्यातील नागरिकांवर आली आहे. ही सगळी परिस्थिती राज्य सरकारचे अपयश दाखवून देते अशी टीका कर्डीले यांनी केली आहे.

- Advertisement -

याआधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही सरकार पडणार असल्याची बाब जाहीर केली होती. “गेल्या काही महिन्यांपासून चर्चा सुरु आहे की हे सरकार जाणार आहे. या चर्चेमध्ये कधीही माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मी किंवा आमच्या कोणत्याही नेत्याने हे सरकार जाऊन तिथे आमचं सराक येणार असल्याचा दावा केलेला नाही. कारण हे सरकार जाण्यासाठी आम्ही कोणतेही प्रयत्न करत नाही. मात्र, उलट आम्ही म्हणतो की हे सरकार त्यांच्यातील अंतर्विरोधामुळं पडेल, असेही ते म्हणाले होते.

त्याआधी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीदेखील असेच वक्तव्य केले होते. फडणवीस म्हणाले होते की, ‘महाविकास आघाडी सरकारचे जे काम सुरू आहे. त्यामुळे जनतेमध्ये प्रचंड आक्रोश आहे. त्यामुळे हे सरकार आपल्या कृतीमुळे कोसळेल, ज्यावेळी हे सरकार पडेल त्यानंतर आम्ही बघू. परंतु आम्हाला सरकार बनवण्याची सध्या कोणतीही घाई नाही, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली होती.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -