घरमुंबईप्रेमविवाहामुळे तिची रेल्वेतील नोकरी गेली

प्रेमविवाहामुळे तिची रेल्वेतील नोकरी गेली

Subscribe

प्रेम ही माणसाच्या मनातील एक पवित्र भावना आहे. वयात आलेल्या तरूण तरूणींनी प्रेमात पडणे हे अगदी नैसर्गिक आहे. पण याच प्रेमामुळे एका युगुलाला कठीण परिस्थितीत लोटले आहे. त्यातील तरूणीवर तर आता रस्त्यावर भिक मागण्याची पाळी आहे.या तरुणीची संपूर्ण व्यथा जाणून घेण्यासाठी पूर्ण बातमी वाचा .......

प्रेम ही माणसाच्या मनातील एक पवित्र भावना आहे. वयात आलेल्या तरूण तरूणींनी प्रेमात पडणे हे अगदी नैसर्गिक आहे. पण याच प्रेमामुळे एका युगुलाला कठीण परिस्थितीत लोटले आहे. त्यातील तरूणीवर तर आता रस्त्यावर भिक मागण्याची पाळी आहे. प्रेमविवाह केल्यामुळे युवतीला नोकरीवरून काढून टाकण्यात आले. तर दुसर्‍या बाजूला तिने जाच्याशी लग्न केले तो तरूणही तुरुंगात गेला आहे. त्या दोघांना ७ महिन्यांचा मुलगा आहे. त्यामुळे आता जगायचं कसं असा प्रश्न तिच्यापुढे पडला आहे.

या प्रेमविवाह करणार्‍या मुलीचं नाव मंजू शिवा वर्मा असून तिचा जन्म मुंबईचा आहे. घरची हलाकीची परिस्थिती असल्यामुळे ती लहानपणापासून आईसोबत कामावर जायची. मंजू 12 वीपर्यंत शिकली. घरच्या गरीबीमुळे तिला पुढील शिक्षण घेता आले नाही. आईसोबत ती मुंबई सेंट्रलच्या रेल्वे स्थानकावर खासगी सफाई कामगार म्हणून २०१६ ला रुजू झाली. त्यामुळे कुटुंबाला हातभार लागत होता. काम करीत असताना रेल्वेच्या पार्सल विभागात काम करणार्‍या शिवा या तरुणाशी तिची ओळख झाली. पाहता पाहता ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले.

- Advertisement -

शिवा आणि मंजूने लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण त्यांच्या प्रेम विवाहाला मंजुच्या परिवाराकडून आणि कामावरील सुपरवायझरचा प्रखर विरोध होता. तरीही शिवा आणि मंजूने लग्न केले. परिणामी तिला व तिच्या आईला कामावरून काढून टाकण्यात आले. त्यानंतर मंजू शिवाकडे राहायला गेली. लोअर परळच्या एका भाड्याचा खोलीत त्यांनी संसार सुरू केला. त्यांना मुलगा झाला. तो आता 7 महिन्यांचा मुलगा आहे. चार दिवसापूर्वी शिवाचे त्याच्या सहकार्‍याशी भांडण झाले. त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. त्यात शिवाच्या सहकार्‍याला गंभीर दुखापत झाली. हाणामारीच्या गुन्ह्यात तो तुरुंगात गेला आहे. स्वत:च्या मुलाचे पालनपोषण करण्याची आणि पतीला तुरूंगातून बाहेर काढण्याची जबाबदारी तिच्यावर आली आहे. त्यासाठी तिची धावपळ सुरू आहे. स्वत:कडे नोकरी नाही. त्यामुळे तिच्यावर भिक मागून जगण्याची पाळी आली आहे.

आईला कळवळामंजुने प्रेमविवाह केल्यामुळे तिच्या घरच्यांनी तिच्याशी नाते तोडले, मात्र मुलीवर आलेली वाईट परिस्थिती बघून मंजुची आई तिला गुपचूप मदत करते. महानगरशी बोलताना मंजूने आपली कैफियत मांडली. तिने आपल्या आईचे नाव सांगण्यास नकार दिला. मंजू आपल्या मुलाला घेऊन मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकांवर बसून असते. लोक देतात त्या पैशावर आपले आणि मुलाचे पोट भरते.

- Advertisement -

सफाई कामगारांची पिळवणूकखासगी महिला सफाई कामगारांची ठेकादारांकडून पिळवूणक होते. त्यांच्या विरोधात बोलल्यास महिलांना कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली जाते. या महिला अशिक्षित आहेत. त्यांना वेळेवर वेतन दिले जात नाही. त्यांची युनियन किंवा संघटना प्रभावी नाही. त्यांना दडपणाखाली काम करावे लागते.

आम्ही कुणाच्याही खासगी जीवनात लक्ष घालत नाही. कामाच्या वेळी मंजू काम करत नव्हती, म्हणून आम्ही तिला कामावरून काढले. आमच्यावर रेल्वे स्थानकांवरील सफाईची जबाबदारी असते. मंजूची गरीब परिस्थिती बघून तिला पुन्हा कामावर घेतले होते. मात्र तिचा कामचुकारपणा सुरूच राहिल्याने तिला काढावे लागले. तिच्याकडून करण्यात येणारे आरोप अंत्यत चुकीचे आहेत.
-अरविंद सिंह , सफाई इंचार्ज, मुंबई सेंट्रल.

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -