घरमुंबईभटकी मांजरे आणि कुत्र्यांसाठी शेल्टर होम

भटकी मांजरे आणि कुत्र्यांसाठी शेल्टर होम

Subscribe

महापालिका कार्यालयांमधील प्राण्यांसाठी विशेष सोय, मालाडमध्ये उभारण्यात येणार निवारा केंद्र

मुंबईतील भटके कुत्रे आणि भटक्या मांजरांचे निर्बिजीकरण करण्यात येत असले तरी महापालिकेच्या विविध कार्यालयांमधील भटके कुत्रे आणि मांजरांचा उपद्व्याप कायमच आहे. त्यामुळे प्राणीप्रेमींना नाराज न करता या प्राण्यांना सुरक्षित ठिकाणी रवानगी करण्याच्यादृष्टीकोनातून निवारा केंद्र अर्थात शेल्टर होम बनण्याचा विचार प्रशासन करत आहे. यासाठी मालाड येथे पाळीव प्राण्यांसाठी निवारा केंद्र बांधले जाणार असून या निवारा केंद्रांमधून अनेक प्राणीप्रेमींना प्राण्यांना दत्तक घेता येणार आहेत.

मुंबईतील अनेक महापालिका कार्यालयांमध्ये भटके कुत्रे आणि मांजरांचा वावर मोठ्याप्रमाणात वाढला आहे. महापालिकेच्या मुख्यालयासह विभागीय कार्यालये तसेच विविध खात्यांच्या कार्यालयांच्या इमारतींमध्ये मोठ्याप्रमाणात भटके कुत्रे तसेच मांजर असल्याने त्या वास्तूंमध्ये ते घाण करत असतात. अनेक ठिकाणी त्यांची विष्ठा पडून इमारतींच्या परिसरांमध्ये दुर्गंधी पसरली जाते. तर मांजरांमुळे कागदपत्रांची नासधुसही केली जाते.

- Advertisement -

त्यामुळे महापालिकेच्या कार्यालय इमारतींमधील भटक्या मांजरासह कुत्र्यांचा होणारा त्रास कमी करण्यासाठी त्यांना बाहेर नेवून सोडण्याची तक्रारी केली जाते. परंतु या पाळीव प्राण्यांना बाहेर नेवून सोडल्यास त्याला प्राणीप्रेमी संस्थांकडून तीव्र विरोध केला जातो. त्यामुळे प्राणीप्रेमींच्या भावना लक्षात घेवून, या पाळीव प्राण्यांना सुरक्षित ठिकाणी नेवून ठेवण्यासाठी विशेष शेल्टर बनवण्याचा विचार प्रशासन करत आहे.

महापालिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेच्या कार्यालय इमारतींमध्ये सध्या मोठ्याप्रमाणात भटकु कुत्रे आणि मांजरांचा वावर वाढलेला आहे. याचा त्रास होत असल्याने त्यावर कारवाई करण्याची मागणी प्रशासनाच्या अधिकार्‍यांकडून केली जाते. परंतु याच भटक्या कुत्र्यांना तसेच मांजरांना काही प्राणीप्रेमी संस्था खायला घालत असल्याने बर्‍याचदा एका कुत्र्यांची किंवा मांजराची संख्या कमी झाली ते त्वरीत तक्रार करतात.

- Advertisement -

त्यामुळे प्राणीप्रेमींचा मान राखत भटके कुत्रे आणि मांजरांचे योग्यजागी पुनर्वसन करता यावे म्हणून मालाड येथे एक जागा निश्चित करून तिथे शेल्टर बांधण्याचे प्रस्तावित आहे. आयुक्तांच्या मान्यतेनंतर हे शेल्टर बांधण्यात येणार असून त्याठिकाणी केवळ महापालिकेच्या इमारतींमधील पाळीव प्राण्यांना तिथे नेवून ठेवले जाणार आहे. या शेल्टरमध्ये पाळीव प्राण्यांची योग्यप्रकारे काळजी घेतली जाणार आहे. त्यामुळे काही पाळीव प्राण्यांना येथील मांजर अथवा कुत्र्यांना दत्तक घेता येईल,असेही त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -