मोटरमेनसाठी रेल्वे स्थानकाबाहेर बांधणार निवारा

Mumbai

नुकत्याच मुंबईत पडलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वेचे मोटरमेन वेळेत कामावर हजर होऊ शकले नाहीत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाला वेळेत लोकल गाडया चालवणे शक्य झाले नाही. भविष्यात अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून रेल्वेने रेल्वेे स्थानकांनजीक मोटरमेनसाठी निवारा उभारण्याची योजना आखली आहे. त्याची सुरूवात मुंबई सेंट्रल या स्थानकापासून होणार आहे. त्यासाठी पश्चिम रेल्वेने योजनासुद्धा तयार केली आहे.

शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवा कोलमडली. तसेच रस्ते वाहतूकही ठप्प झाली होती. त्यामुळे रेल्वेचे अनेक कर्मचारी आपल्या निवास स्थानापासून कारशेडपर्यंत उशीरा पोहचले. त्यामुळे लोकल कारशेड मधून बाहेर काढण्यास विलंब झाला. भविष्यात अशी समस्या उद्भवू नये म्हणून रेल्वेच्या मोटरमेनची निवास स्थाने स्थाने रेल्वे स्थानकांजवळ उभारण्याची योजना आखण्यात आली आहे. याची सुरूवात मुबई सेट्रल रेल्वे स्थानकांपासून होत आहे. अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली. मात्र यासंबंधी माहिती पश्चिम रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी रविंद्र भाकर यांना विचारली असता. त्यांनी सागितले की, आमाच्याकडे अशी कसलीही माहिती अद्यापही आलेली नाही. जेव्हा माहिती येईल तेव्हा तुम्हाला आम्ही सागू.

मोटरमेनना मिळणार दिलासा
मध्य आणि पश्चिम रेल्वे मिळून सरासरी 1200 पेक्षा जास्त मोटरमेन आहेत. या मोटरमेनना रेल्वेकडून मिळालेल्या सदनिका रेल्वे स्थानकांपासून लांब असतात. त्यामुळे पावसाळ्यात त्यांना वेळेत कामावर पोहचताना तारेवरची कसरत करावी लागते. रेल्वे कर्मचारी संघटनांनी ही समस्या वेळोवेळी रेल्वेच्या लक्षात आणून दिली आहे. त्यामुळे अनेक प्रमुख रेल्वे स्थानकांत सद्या मॉटरमेनसाठी रनिंग विश्रांती गृह निर्माण केली आहेत. आता रेल्वे स्थानकांबाहेर मॉटरमेनसाठी निवारासुध्दा बाधण्यात येणार आहे.

आरपीएफला सुध्दा मिळणार नवी इमारत
पश्चिम रेल्वेचा मुंबई विभागातील रेल्वे पोलिसांनासुद्धा नवीन इमारत मिळणार आहे. मुंबई सेट्रल रेल्वे स्थानकाचा पुर्वेला असलेल्या आरपीएफ कार्यालयाच्या जागी पाच मजली इमारत रेल्वेकडून बांधण्यात येणार आहे. त्याचे काम येत्या काळात सुरु होणार आहे. या पाच मजली इमारतीच्या तळमजल्यावर रेल्वे पोलिसांचे कार्यालय असणार आहे. उर्वरित मजल्यावर मोटरमेनसाठी सदनिका असणार आहे.