घरमुंबई'शिवकुमार गो बॅक'; कर्नाटकच्या राजकीय नाट्याला वेगळे वळण

‘शिवकुमार गो बॅक’; कर्नाटकच्या राजकीय नाट्याला वेगळे वळण

Subscribe

कर्नाटकमधील राजकीय नाट्याला वेगळे वळण लागले आहे. रेनिसन्स हॉटेलमध्ये थांबलेल्या आमदारांच्या भेटीसाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डी के शिवकुमार गेले असता हॉटेलच्या गेटवर मोठा गदारोळ झाला.

कर्नाटकच्या राजकीय नाट्याला वेगळे वळण लागले आहे. राजीनामा दिलेल्या काँग्रेस आणि जेडीएसचे १३ आमदार मुंबईतील रेनिसन्स हॉटेलमध्ये वास्तव्यास आहेत. त्यांची मनधरणी करण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डी के शिवकुमार मुंबईत दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत जेडीएसचे आमदार शिवलिंग गोडा देखील मुंबईत आले आहेत. दरम्यान, आमदारांशी बोलण्यासाठी शिवकुमार रेनिसन्स हॉटेलच्या गेटवर गेले तेव्हा मोठा गोंधळ झाला. कार्यकर्त्यांनी ‘शिवकुमार गो बॅक’ असा नारा दिला. त्यामुळे मोठा गदारोळ झाला. घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

बंडखोर आमदारांचे पोलीस आयुक्तांना पत्र

राजीनामे दिलेले बंडखोर आमदार मुंबईच्या पवई येथील रेनिसन्स हॉटेलमध्ये तळ ठोकून आहेत. त्यांनी मंगळवारी रात्री मुंबईच्या पोलीस आयुक्तांना पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी आपला जीव धोक्यात असल्याचे म्हटले आहे. कुमारस्वामी आणि शिवकुमार यांच्यापासून आपल्याला धोका असल्याचे त्यांनी म्हटले. त्यामुळे संरक्षणासाठी मदत करा, असे पत्रात म्हटले होते. याशिवाय ‘कुमारस्वामी आणि डी. के. शिवकुमार आम्हाला भेटीसाठी येण्याची दाट शक्यता आहे. ते आमची मनधरणी करण्यासाठी येतील. मात्र, आम्हाला त्यांच्याशी भेटण्याची इच्छा नाही. त्यामुळे कृपया सहकार्य करावे’, असेही पत्रात म्हटले गेले होते. आमदारांच्या या पत्रानंतर रेनिसन्स हॉटेलबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला.

- Advertisement -

हेही वाचा – कुमारस्वामींना १७ जुलैला बहुमत सिद्ध करण्याचे आव्हान!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -