बदलापूरमध्ये शिवसैनिकांनी स्वतःच्या नगरसेवकाचे कार्यालय तोडले!

या घटनेनंतर बदलापूरमधील शिवसेनेचे नगरसेवक शैलेश वडनेरे आणि शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्यातील वाद पक्षाच्या चिंतेत वाढ करणारा ठरेल.

Badlapur
Shiv Sainik Vandalize Own Corporator

विधानसभा निवडणूका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. एकीकडे विधानसभेसाठी युती, आघाडींची बोलणी सुरु आहेत तर दुसरीकडे पक्षांमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत आहेत. बदलापूरमध्ये आज दुपारी शिवसैनिकांनी त्यांचेच नगरसेवक शैलेश वडनेरे यांच्या कार्यालयाची तोडफोड केली. दरम्यान या प्रकारानंतर नगरसेवक शैलेश वडनेरे यांनी बदलापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन शिवसैनिकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर बदलापूरमधील शिवसेनेचे नगरसेवक शैलेश वडनेरे आणि शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्यातील वाद पक्षाच्या चिंतेत वाढ करणारा ठरेल.

हेही वाचा – विहार, तुळशी, पवई तलाव भरल्यानंतरच ‘मिठी’चा धोका

Shiv Sainik Vandalize Own Corporator १

मागील वर्षभरापासून नगरसेवक आणि शहरप्रमुखात वाद

बदलापूर पालिकेच्या सर्वसाधारण सभेपूर्वी शहरप्रमुख वामन म्हात्रे आणि नगरसेवक शैलेश वडनेरे यांच्यात वाद झाला होता. सभा संपल्यानंतर या वादाचे पडसाद उमटले. सभा पार पडल्यानंतर काही शिवसैनिकांनी नगरसेवक शैलेश वडनेरे यांच्या कार्यालयावर हल्ला चढवला. यावेळी शिवसैनिकांनी कार्यालयाची तोडफोड करत मोठे नुकसान केले. या घटनेनंतर बदलापूरमधील शिवसेनेचा नगरसेवक आणि शहरप्रमुख यांच्यातील वाद पुन्हा समोर आला. मागील वर्षभरापासून नगरसेवक शैलेश वडनेरे आणि शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्यामध्ये राजकीय वाद होत आहेत. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर नगरसेवक वडनेरे यांनी मागील सहा महिन्यांपासूनच निवडणुकांच्या प्रचाराचे काम हाती घेतले. त्यामुळे नगरसेवक आणि शहरप्रमुखामधील वाद आणखीनच वाढला. या संघर्षातूनच हा हल्ला करण्यात आला असावा.