घरमुंबईसेनेचा भाजपवर पुन्हा हल्लाबोल

सेनेचा भाजपवर पुन्हा हल्लाबोल

Subscribe

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युतीसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये युतीबाबत एकीकडे चर्चा सुरु असतानाच शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भाजपाच्या नेत्यांकडून आगामी निवडणुकीत भाजप किती जागा जिंकू शकले, याबाबत अंदाज वर्तविण्यात येत आहेत. यावरुन शिवसेनेने सामानच्या अग्रलेखातून सोमवारी सडकून टीका केला आहे. थंडीने दवबिंदू गोठतात तसे राजकीय अतिसाराने सत्ताधार्‍यांची बुद्धी व मन गोठले असल्याचे टीकास्त्र यावेळी सामानच्या अग्रलेखातून सोडण्यात आले आहे.

शिवसेनेचा मुखपत्र सामनातून गेल्या अनेक दिवांपासून भारतीय जनता पार्टीवर टीका करण्यात येत आहेत. काही दिवसांपूर्वी राम मंदीर आणि इतर मुद्यावरुन टीका करण्यात आल्यानंतर सोमवारी पुन्हा एकदा सामनाच्या अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे. याला पाडू, त्याला पाडू दुसरे काय करणार? या मथळ्याखाली लिहण्यात आलेल्या अग्रलेखातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे.

- Advertisement -

यावेळी मुख्यमंत्र्यांवर टीका करताना सत्ता कोणाला नको आहे? राजकारण करणार्‍या सगळ्यांनाच ती हवी आहे, पण चोवीस तास त्याच नशेत राहून झिंगणे व झिंगल्यासारखे तर्राट बोलणे हे बरे नाही,असे नमूद करण्यात आले आहे. तर महाराष्ट्रात 48 पैकी 43 जागा जिंकण्याचा ‘तोडगा’ यांच्यापाशी आहे. जनता मरू द्या, राज्य खाक होऊ द्या, पण राजकारण टिकले पाहिजे. याला पाडू, त्याला पाडू असे सध्या सुरू आहे. याच धुंदीत उद्या हे स्वतःच कोसळतील, तरीही यांचा गिरे तो भी टांग उपर या पद्धतीने कारभार सुरूच राहील. थंडीने दवबिंदू गोठतात तसे राजकीय अतिसाराने सत्ताधार्यांची बुद्धी व मन गोठले असल्याचे टीका यावेळी करण्यात आले आहे.

याबरोबरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आत्मबलाचे कौतुक करावे तेवढे थोडेच. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत पुणे मुक्कामी फडणवीस यांनी नारा दिला आहे की, ‘‘गेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात आम्ही 42 जागा जिंकल्या होत्या. यावेळी आम्ही कुठल्याही परिस्थितीत 43 जागा जिंकू.’’ फडणवीस यांचा असाही दावा आहे की, यावेळी आम्ही बारामतीत पवारांचा पाडाव करू. यावर पवारांनी त्यांच्या स्वभावाप्रमाणे भाजपास शुभेच्छा दिल्या आहेत. खरे तर महाराष्ट्रातील पैकीच्या पैकी म्हणजे 48 जागा हे लोक सहज जिंकू शकतात व देशात स्वबळावर 548 जागा कुठेच गेल्या नाहीत, असा टोलाही यावेळी लगाविण्यात आला आहे.

- Advertisement -

विशेष म्हणजे, ‘ईव्हीएम’ आणि असा हा फसफसणारा आत्मविश्वास सोबतीला असताना लंडन, अमेरिकेतही ‘कमळ’ फुलू शकेल, पण त्याआधी अयोध्येत राममंदिराचे कमळ का फुलले नाही? याचे उत्तर द्या. अशा अनेक प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडे नाहीत, पण ‘‘याला पाडू, त्याला पाडू, त्याला गाडू’’ वगैरे भाषा सध्या दिल्लीपासून गल्लीपर्यंत सुरू आहेत. पाडापाडीची भाषा यांच्या तोंडात इतकी रुळली आहे की, एखाद दिवस ‘स्लिप ऑफ टंग’ होऊन स्वतःच्याच अमुक-तमुक लोकांना पाडू असे यांच्या तोंडून बाहेर पडू नये म्हणजे झाले. राज्यकर्त्या पक्षात जो संयम, विनम्र भाव असायला हवा तो अलीकडच्या काळात नष्ट झाला आहे. एक प्रकारची राजकीय बधिरता निर्माण झाली आहे. विरोधी पक्ष बेलगाम बोलतो हे मान्य, पण म्हणून सत्ताधारी पक्षानेही असे बेलगाम बोलू नये, असा सल्लाही यावेळी अग्रलेखातून देण्यात आला आहे. त्यामुळे सामानाचा हा अग्रलेख भाजपाच्या कितपत जिव्हारी लागतोय हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -