घरमुंबईशिवसेना-भाजपचं अखेर ठरलं हो!

शिवसेना-भाजपचं अखेर ठरलं हो!

Subscribe

अमित शहा आणि उध्दव ठाकरे यांची संध्याकाळी ६.३० वाजता वरळीच्या ब्ल्यू सी हॉटेलमध्ये संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे.

शिवसेना-भाजप युतीची आज घोषणा होणार आहे. युतीसंदर्भात चर्चा करण्यासाठी अमित शहा मुंबई विमानतळावर दाखल झाले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, जलसंपदा मंत्री गिरिश महाजन अमित शहांच्या स्वागतासाठी विमानतळावर दाखल झाले आहेत. अमित शहा मातोश्रीवर उध्दव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.

ब्ल्यू सी हॉटेलमध्ये पत्रकार परिषद

भाजप अध्यक्ष अमित शहा मुंबई विमानतळावर दाखल झाले. मातोश्रीवर जाऊन ते उध्दव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर अमित शहा आणि उध्दव ठाकरे यांची संध्याकाळी ६.३० वाजता वरळीच्या ब्ल्यू सी हॉटेलमध्ये संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे उपस्थित राहणार आहेत.

- Advertisement -

५०- ५० टक्क्यांचा फॉर्म्युला

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी शिवसेना-भाजप यांच्या युतीची बोलणी पूर्ण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला पालघर लोकसभा मतदार संघ देणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील ४८ पैकी शिवसेना २३ तर भाजप २५ जागांवर उमेदवार उभे करणार आहेत. विधानसभा निवडणुकीत २८८ पैकी शिवसेना १४४ आणि भाजप १४४ असा ५०-५० टक्केचा फॉर्म्युला असणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या युतीच्या चर्चेला आज पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.

ठाकरेंच्या स्मारकाचे मोदींच्या हस्ते होणार भूमिपूजन?

दरम्यान, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. येत्या २४ फेब्रुवारीला भूमिपूजन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या २४ तारखेला मोदी मुंबई दौऱ्यावर असण्याची शक्यता आहे. युतीचा निर्णय झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एका व्यासपीठावर येणार असल्याची सुत्रांची माहिती आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -