घरमुंबईशिवसेना नगरसेविकेने केली शेड बांधण्याची मागणी

शिवसेना नगरसेविकेने केली शेड बांधण्याची मागणी

Subscribe

उन्हाच्या तडाख्याने अंगाची लाहीलाही होणार्‍या जनतेला आता सावलीची गरज भासू लागली असून यावर पर्याय म्हणून किमान रस्त्यावरील सिग्नलच्या परिसरात शेड बांधण्याची मागणी होत आहे.

मुंबईत सध्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरु असून पावसाळ्यात झाडांच्या पडझडीमुळे दुर्घटना होवू नये म्हणून अनेक झाडांच्या फांद्यांची छाटणी सुरु आहे. त्यामुळे मुंबईकरांची सावली हिरावून घेतली जात आहे. परिणामी रखरखत्या उन्हाच्या झळा नागरिकांना सहन कराव्या लागत आहेत. त्यामुळे उन्हाच्या तडाख्याने अंगाची लाहीलाही होणार्‍या जनतेला आता सावलीची गरज भासू लागली असून यावर पर्याय म्हणून किमान रस्त्यावरील सिग्नलच्या परिसरात शेड बांधण्याची मागणी होत आहे.

ट्रॅफिक सिग्नलच्या ठिकाणी सुविधा द्यावी

वृक्षतोड आणि वाढते प्रदुषण यामुळे वातावरणातील तापमान वाढतच आहे. कडक ऊन, तापलेले रस्ते, वाढते तापमान आणि वाहतुकीची होणारी कोंडी यामुळे वाहन चालकांना तसेच पादचार्‍यांना अतिशय त्रास सहन करावा लागत आहे. यावर उपाय म्हणून पुणे आणि नागपूर शहरामध्ये रस्त्यांवरील वाहतूक नियंत्रकाच्या ठिकाणी (ट्रॅफिक सिग्नल) कापडी छप्पर आच्छादून एक अनोखी संकल्पना राबवण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईतील ट्रॅफिक सिग्नलच्या ठिकाणी अशा प्रकारची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेविका सुजाता उदेश पाटेकर यांनी केली आहे. अशा प्रकारची सुविधा उपलब्ध करून दिल्यास भर उन्हात वाहन चालकांना व पादचार्‍यांना उन्हाच्या तडाख्यापासून काही अंशी या सावलीमुळे दिलासा मिळेल, असे त्यांनी म्हटले आहे. मुंबईत या पावसाळ्यात रस्त्यालगतच्या सुमारे एक लाख झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईत सावली कुठेच नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

हेही वाचा –

…जेव्हा विरोधक घेतात कृषी मंत्र्यांच्या आंदोलक बहिणीची बाजू

मोदींना जीवे मारण्याची धमकी; मल्याळम भाषेत लिहिली नोट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -