घरमुंबईशिवसेना नेते अब्दुल सत्तार यांची इम्तियाज जलील यांना ऑफर

शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांची इम्तियाज जलील यांना ऑफर

Subscribe

'एमआयएम आणि मंदिर यांचा संबंध नाही. त्यामुळे इम्तियाज जलील यांना एमआयएममध्ये न राहता, त्यांना शिवसेनेत आणले पाहिजे. ते शिवसेनेत आले तर त्यांना आम्ही राज्यसभेत पाठवू'

देशभरासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरूच आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच धार्मिक स्थळं बंद ठेवण्यात आली आहे. दरम्यान कित्येक महिने बंद असलेली धार्मिक स्थळं उघडण्याच्या मुद्द्यावरून शिवसेना नेते, राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार आणि खासदार इम्तियाज जलील यांच्यात चांगलाच शाब्दिक हल्लाबोल झाल्याचे बघायला मिळाले. दरम्यान एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात दोघे बोलत होते.

…त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल

यावेळी सरकारला जागं करण्यासाठी मी मंदिरं, मशिदी खुली करण्याची मागणी केली. लोकांना जागृत करण्यासाठी मी मंदिरं, मशिदी खुली करण्यासाठी आंदोलन केले. एमआयएम पक्षाचा मुस्लीम खासदार मंदिरं खुली करण्याची भूमिका मांडतो, याचं स्वागत होईल, असे मला वाटले होते. जात-धर्माचे अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र मला केलेला विरोध निंदनीय होता. मंदिरे, मशिदी उघडणे गरजेचे आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असे इम्तियाज जलील यांनी म्हटले.

- Advertisement -

ते शिवसेनेत आले तर त्यांना राज्यसभेत पाठवू

तर यावर अब्दुल सत्तार असे म्हणाले की, इम्तियाज जलील यांनी मंदिरं उघण्याची भूमिका घेतली तेव्हा मला आश्चर्य वाटले. जलील साहेब अशी भूमिका घेऊ लागल्याने मी एका मित्राला विचारले की मध्यवर्ती निवडणुका लागल्यात का? असा टोला अब्दुल सत्तार यांनी लगावला. एमआयएम आणि मंदिर यांचा संबंध नाही. त्यामुळे इम्तियाज जलील यांना एमआयएममध्ये न राहता, त्यांना शिवसेनेत आणले पाहिजे. ते शिवसेनेत आले तर त्यांना आम्ही राज्यसभेत पाठवू, असं ही अब्दुल सत्तार म्हणाले.

दरम्यान, सरकार मंदिरं, मशिदी खुली करण्यासाठी हालचाली करत आहे. हे इम्तियाल जलील यांना कळलं म्हणून त्यांनी ही भूमिका घेतली, असा टोलाही सत्तार यांनी लगावल्याचे दिसले.


‘मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसली’, चंद्रकांत पाटील यांची पवारांवर टीका
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -