घरमुंबईमुंबईच्या आमदारांना मोकळीक, इतर आमदारच नजरकैदेत

मुंबईच्या आमदारांना मोकळीक, इतर आमदारच नजरकैदेत

Subscribe

रंगशारदातून सर्व आमदारांना शुक्रवारी हलवले मढच्या रिट्रीटमध्ये

शिवसेनेचे सर्व आमदारांना सध्या वांद्रे पश्चिम येथील ‘रंगशारदा’ ठेवण्यात आल्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी सात वाजता यासर्व आमदारांना बसमधून थेट मढ येथील हॉटेलमध्ये सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. परंतु यासर्व आमदारांना फुटण्याच्या भीतीने रंगशारदा’ त ठेवण्यात आले असले तरी मुंबईतील आमदारांना मात्र, मोकळे ठेवण्यात आले होते. ठाण्यासह ग्रामीण भागातील आमदार फुटण्याचीची अधिक भीती असल्याने शिवसेनेने त्यांना एकत्रपणे रंगशारदा’ त नजर कैदेत ठेवले होते. परंतु मुंबईतील आमदार फुटण्याची शक्यता कमी असल्याने, त्यांना घरी जावून विभागातील इतर कामे करण्यास मुभा दिली जात होती. त्यामुळे शिवसेनेचा मुंबई वगळता अन्य भागातील आमदारांवर अविश्वास असल्याचे स्पष्ट दिसून येते.

राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा वाढतच जात असून अद्यापही युतीची सत्ता स्थापन न झाल्याने आमदारांची पळवापळवी होवू नये या भीतीने शिवसेनेने अपक्षांसह आपल्या सर्व आमदारांना वांद्य्रातील रंगशारदात राहण्याची व्यवस्था केली. गुरुवारी सकाळी सर्व आमदारांची मातोश्रीवर बैठक पार पडल्यानंतर, यासर्व आमदारांना रंगशारदा’त हलवले. परंतु रंगशारदा’ तील राहण्याच्या खोल्यांमध्ये अस्वच्छता आणि अपुरी जागा यामुळे सर्व आमदारांनी याठिकाणांहून हलवण्याची सूचना पक्षाच्या नेत्यांकडे केली होती. मात्र, हे सर्व आमदार रंगशारदा’ त असताना दुसरीकडे मुंबईतील आमदारांना मात्र सवलत देण्यात आली होती. त्यामुळेे मुंबईतील आमदार बाहेर फिरत होते. तसेच घरीही जावून राहत होते.

- Advertisement -

आमदारांची मुंबईत राहण्याची व्यवस्था नसल्याने ग्रामीण भागातील आमदारांना एकत्र राहता यावे म्हणून रंगशारदा’ ठेवण्यात आल्याचे शिवसेना नेते संजय राउुत यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते. परंतु शिवसेनेच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील आमदार हे फुटण्याची शक्यता नसून याउलट मुंबई वगळता अन्य भागातील आमदारांना फोडण्याची भीती पक्षाला अधिक होती. त्यामुळे या सर्वांना जास्त दिवस बाहेर ठेवणे धोक्याचे असल्याने त्यांना मुंबईतच आपल्या नजर कैदेत ठेवण्याचा निर्णय घेतला. परंतु त्याचवेळी मुंबईतील आमदारांना आपल्या घरी जाण्यास तसेच आपली कामे करून पुन्हा याठिकाणी येण्यास मुभा दिली होती. शिवसेनेचे मुंबईतील सर्वच आमदार रात्री आपल्या घरी जावून, सकाळी पुन्हा रंगशारदात परतले. त्यानंतर पुन्हा एकदा आपली कामे करून संध्याकाळी सहा पूर्वी रंगशारदात परतले अशी माहिती मिळाली आहे.

रंगशारदा’ तील जागा अपुरी असल्याची तक्रारी आमदारांनी केल्यानंतर तसेच ही जागा असुरक्षित असल्याने शिवसेनेने यासर्व आमदारांना मढ येथील दि रिट्रीट मध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार यासर्व आमदारांना शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता बसमधून मढ येथील रिट्रीट हॉटेलमध्ये हलवण्यात आले.

- Advertisement -

शिवसेनेनं त्यांचे सर्व आमदार आणि समर्थक अपक्ष आमदारांना पोलिस सुरक्षा मागितली आहे. शिवसेनेचे सर्व आमदार दिनांक १५ नोव्हेंबर २०१९ पर्यंत मालाड मढ आय लँड येथील हाँटेल रिट्रीट येथे रहाणार आहेत. त्यामुळे या हाँटेलची आणि शिवसेनेचे सर्व आमदार आणि अपक्ष आमदारांची सुरक्षा व्यवस्था ठेवण्याची विनंती शिवसेना सचिव मिलींद नार्वेकर यांनी पत्राद्वारे मुंबई पोलिस आयुक्त संजय बर्वे यांच्याकडेकेली आहे. याच हाँटेलवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे आमदारांना भेटण्यासाठी ही येणार आहेत. त्यामुळे पोलिस सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात येणार आहे. रंगशारदा हाँटेल मध्येही सर्व आमदारांच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांना अधिकृत पत्र शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी दिलं होते. त्यानुसार पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था पुरवली होती,असे शिवसेनेकडून अधिकृतपणे सांगण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -