घरमुंबईशिवसेना खासदाराच्या गाडीने हरणाला चिरडले

शिवसेना खासदाराच्या गाडीने हरणाला चिरडले

Subscribe

शिवसेनेच्या एका खासदाराच्या गाडीने हरिणाला चिरडल्याची घटना घडली आहे.

शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांच्या गाडीने हरणाला चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी चालकाला अटक करण्यात आली आहे. शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांच्या एसयूव्ही चारचाकी वाहनाने बुधवारी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात हरणाला चिरडल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी बेजबाबदारपणे बेधडक वाहन चालविणाऱ्या चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

- Advertisement -

कुठे घडली घटना

एसजीएनपीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गावित यांच्या नावे नोंदवलेल्या एसयूव्ही कारने एसजीएनपीच्याआत त्रिमूर्ती स्टेशनलगतचा रस्ता ओलांडणाऱ्या हरणाला गाडीखाली चिरडून ठार केले आहे. एसजीएनपीच्या अन्य सूत्रांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले आहे की, ही घटना सायंकाळी ६ ते ६.३० वाजताच्या सुमारास घडली आहे.

एसटीएनपी मुख्य गेटकडे कार जात असताना गांधी टेकडीजवळ हरिण गाडीखाली आले. चालकाने आम्हाला अपघाताची माहिती मुख्य प्रवेशद्वाराकडे देण्यात आली. तेव्हा जखमी हरिणाला तातडीने एसजीएनपी पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्या हरिणाचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

आम्ही वाहनचालकांना एसजीएनपीमध्ये वाहन चालक कायद्याचे पालन करण्याचे आवाहन करु इच्छितो. आम्ही पर्यटकांमध्ये जागरुकता निर्माण करत आहोत आणि लवकरच मोहिम देखील सुरु करणार आहोत.  – अन्वर अहमद; मुख्य वनसंरक्षक आणि एसजीएनपीचे संचालक


हेही वाचा – चित्रपटात वापरल्या जाणाऱ्या महागड्या कपड्यांचे पुढे काय होते?


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -