घरमुंबईआज शिवसेनेचा मोर्चा; असा असेल मार्ग

आज शिवसेनेचा मोर्चा; असा असेल मार्ग

Subscribe

शिवसेना आज विमा कंपनीच्या विरोधात मोर्चा काढणार आहे. शेतकऱ्यांना विम्याचा योग्य मोबदला मिळावा, यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाबाबत शिवसेनेने ‘सामना’ मुखपत्रातही माहिती दिली आहे. शेतकऱ्यांसाठी शहरीबाबू रस्त्यावर उतरणार असे शिवसेना म्हणाली आहे. हे आंदोलन प्रचंड मोठे असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा मोर्चा सकाळी अकरा वाजता निघणार आहे.

शिवसेनेच्या महामोर्चाचा मार्ग

  • बीकेसीमधील एशियन हार्ट इन्स्टिटय़ूटसमोरील एमएमआरडीएच्या पार्किंग लॉटजवळून सकाळी ठीक ११ वाजता या मोर्चाला सुरुवात होईल.
  • बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, कोटक महिंद्रा कंपनीच्या इमारतीसमोरील मार्गाने हा मोर्चा पुढे जाईल.
  • जियो वर्ल्ड कंपनीच्या इमारतीला वळसा घेऊन ‘परीणी’ या इमारतीसमोर मोर्चा थांबेल.
  • परिणी इमारतीच्या १९ व्या मजल्यावर ‘भारती एक्सा’ कंपनीचे कार्यालय आहे. शिवसेनेचे शिष्टमंडळ त्या कार्यालयात जाऊन विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक करेल.
  • बैठक संपल्यावर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे मोर्चा समोर भाषण करण्याची शक्यता आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -