दंगलीबद्दल माहिती असेल, तर पोलिसांना कळवा – संजय राऊत

राम मंदिराच्या मुद्यावरुन देशात दंगल घडवण्याचा कट आखला जात असल्याचा दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता. यावर शिवसेनेने आपली प्रतिक्रिया दिली होती.

Mumbai
Sanjay-raut
शिवसेना खासदार संजय राऊत

राम मंदिराच्या मुद्यावरुन देशात दंगल घडवण्याचा कट आखला जात असल्याचा दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता. ते काल विक्रोळी येथील एका कार्यक्रमात बोलत होते. त्यांच्या या दाव्यावर शिवसेनेने प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेकडून राज ठाकरे यांच्या या वक्तव्याची खिल्ली उडवली गेली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दंगलीबद्दल माहिती असेल, तर पोलिसांना कळवा असा टोला लगावला आहे.

हेही वाचा – राम मंदिरावरुन देशात दंगली घडवण्याचे कारस्थान – राज ठाकरे

नेमकं काय म्हटले होते राज ठाकरे?

गेल्या काही दिवसांपासून राम मंदिराच्या मुद्यावर बरीच चर्चा रंगली आहे. राम मंदिर बांधले जावे यासाठी शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे स्वत: अयोध्येचा दौरा करुन आले. या सर्व पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आपले मत व्यक्त केले आहे. राम मंदिर बांधले गेलेच पाहिजे असे स्पष्ट मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले होते. त्याचबरोबर राज ठाकरे म्हणाले होते की, पुढच्या काही दिवसांमध्ये देशात राम मंदिरच्या मुद्दयांवर दंगली घडविण्यासाठी ओवेसी सारख्या लोकांबरोबर बोलणी सुरु आहेत. कारण या नाकर्त्या सरकारला हिंदू-मुस्लिम दंग्यांवर निवडणूक लढवायची आहे, असा आरोप राज ठाकरे यांच्याकडून करण्यात आला होता. त्यांच्या या आरोपांचे शिवसेनेने खिल्ली उडवले आहे. जर दंगलीबद्दल तुम्हाला माहिती असेल, तर पोलिसांना कळवा, असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. दरम्यान, सध्या देशात सुरु असणाऱ्या प्रचारसभांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची परिसिमा गाठताना दिसत आहे. त्यात अकबरुद्दीन ओवेसी यांनी मोदींवर केलेली वादग्रस्त टीका त्याचेच एक ताजे उदाहरण आहे.


हेही वाचा – राम मंदिरासाठी संतांचे राज्यपालांना निवेदन

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here