शिवसेना एनडीएतून बाहेर पडणार

Mumbai
शिवसेना

राज्यात सत्तास्थापनेसाठी शिवसेना आता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणार हे निश्चित झाले आहे. मात्र आघाडीत यायचे असेल तर एनडीएतून बाहेर पडावे, अशी अट राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला घातली आहे. त्यामुळे आता शिवसेना केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडणार हे निश्चित झाले आहे.

भाजप आणि शिवसेना राज्यात भांडत असले तरी केंद्रात दोघेही सोबत आहेत. केंद्रात भाजपला स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळालेले आहे. बहुमतासाठी लोकसभेत 273 खासदारांची गरज असताना भाजपकडे 303 खासदार आहेत. त्यामुळे शिवसेना एनडीएतून बाहेर पडली तरी केंद्रातील भाजपच्या सत्तेवर त्याचा विशेष परिणाम होणार नाही.

लोकसभेतील संख्याबळ
भाजप – 303
काँग्रेस – 52
डीएमके – 24
वायएसआर काँग्रेस – 22
तृणमुल काँग्रेस – 22
शिवसेना – 18
जेडीयू – 16
बीजेडी – 12
बीएसपी – 10
टीआरएस – 9
लोजप – 6
राष्ट्रवादी काँग्रेस – 5
सपा – 5

मुंबई महापालिकेत भाजप शिवसेनेसोबत सत्तेत थेट सहभागी नाही. मात्र, भाजपला 2014 मध्ये राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा दिल्याने भाजपने मुंबईच्या महापौर पदावर दावा केला नाही. शिवसेनेला बीएमसी महापौर पदावर दावा करण्यासाठी बहुमताचा जादुई आकडा 113 होता. त्यासाठी भाजपने शिवसेनेला मदत केली. मात्र, देशाची आर्थिक राजधानी असलेले मुंबई महापौर पद कायम ठेवण्यासाठी शिवसेनेला भाजपने आव्हान दिल्यास इतर पक्षांची मदत घ्यावी लागणार आहे.

त्यामुळे भाजपने मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेच्या महापौर दाव्याला विरोध केल्यास राजकीय उलथापालथ पाहायला मिळेल. त्यावेळी शिवसेनेला काँग्रेस-राष्ट्रवादीसह इतर पक्षांचा पाठिंबा घ्यावा लागेल. आता भाजप-शिवसेना संघर्ष आणखी वाढवणार की हो दोन्ही पक्ष मध्य काढत पुन्हा एकत्र येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here