घरमुंबईअवैध जात प्रकरण; केडीएमसीच्या माजी महापौरांचे नगरसेवक पद रद्द

अवैध जात प्रकरण; केडीएमसीच्या माजी महापौरांचे नगरसेवक पद रद्द

Subscribe

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या माजी महापौर आणि शिवसेना नगरसेविका वैजयंती घोलप यांनी खोटी जात लावल्यामुळे त्यांना आपले पद गमवावे लागले आहे.

शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका आणि केडीएमसीच्या माजी महापौर वैजयंती घोलप यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त गोविंद बोडके यांनी ही कारवाई केली आहे. घोलप या कल्याणच्या रामबाग प्रभागातून आतापर्यंत सलग पाचवेळा निवडून आल्या होत्या. मात्र २०१० साली त्यांचा प्रभाग ओबीसी प्रवर्गासाठी राखीव झाला होता. त्यानंतर घोलप यांनी धनगर जातीचे प्रमाणपत्राच्या आधारावर निवडणूक लढवली. याच काळात त्यांनी केडीएमसीचे महापौरपदही भूषवले होते. मात्र त्यांच्या जात प्रमाणपत्रावर त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार गौरव गुजर यांनी आक्षेप घेतला होता.

त्यानंतर हे प्रकरण जात पडताळणी समितीकडे गेले होते. जात पडताळणी समितीने घोलप यांचे प्रमाणपत्र अवैध ठरवले होते. घोलप यांनी जात वैधता समितीच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळून लावत जात पडताळणी समितीचा निर्णय कायम ठेवला.

- Advertisement -

वैजयंती घोलप या धनगर समाजाच्या नसून खाटीक आहेत. खाटीक ही जात अनुसूचित जमातींमध्ये येत असून घोलप यांनी ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असलेल्या मतदारसंघातून निवडणूक लढवली असल्याचा आक्षेप भाजपचे गौरव गुजर यांनी घेतला होता. जात पडताळणी समितीच्या समोर झालेल्या सुनावणीमध्ये पुराव्यांच्या आधारे समितीने घोलप यांचे ओबीसी प्रमाणपत्र रद्द ठरवले. या निर्णयामुळे महापालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेनेला झटका बसला असल्याचे बोलले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -