शिवडी अपघातातील जखमी कल्पेशचा उपचारा दरम्यान मृत्यू

या अपघात प्रकरणी रफी अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी अर्टिगा कार चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे.

Mumbai
kalpesh dharase dies during treatment
शिवडी अपघातात कल्पेशच धारसेचा उपचारा दरम्यान मृत्यू

शिवडी अपघातामधील मृतांचा आकडा दोनवर गेला आहे. झकेरीया बंदर या ठिकाणी रविवारी दुपारी झालेल्या अपघातात जखमी असणाऱ्या कल्पेश घारगेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. केईएम रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात कल्पेशवर उपचार सुरू होते. उपचारा दरम्यान सोमवारी पहाटे कल्पेशचा मृत्यू झाला.

असा झाला होता अपघात

शिवडीमध्ये भरधाव वेगाने माझगावच्या दिशेने निघालेल्या एका अर्टिगा कारने बसथांब्यावर उभे असणाऱ्या प्रवाशांना धडक देत एका उभ्या असलेल्या ट्रकवर आदळली. या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला होता तर अर्टिगा कारमधील दोघांसह ७ जण जखमी झाले होते. हा अपघात रविवारी सायंकाळी ४.३० वाजता शिवडी येथील झकेरिया बंदर येथे झाला. जखमींना उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यामधील दोघांची प्रकृती गंभीर होती. त्यामधील कल्पेशचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या अपघात प्रकरणी रफी अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी अर्टिगा कार चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे.

कल्पेशचा होता वाढदिवस

कल्पेश धारसे याचा रविवारी वाढदिवस होता. त्याच्या वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याचे नातेवाईक शिवडी येथे आले होते. अपघातामध्ये जखमी झालेले कल्पेशचे नातेवाईक आहेत. वाढदिवस साजरा करून त्याचे नातेवाईक घरी जाण्यासाठी बसची वाट पहात बसथांब्यावर उभे होते. कल्पेश त्यांना सोडवण्यासाठी आला होता. त्यावेळी माझगावच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या अर्टीगा कारने सहाही जणांना धकड दिली होती. त्यात दर्शन पाटील (१८) याचा जागीच मृत्यू झाला होता. तर अर्टीगा कल्पेशसह ७ जण जखमी झाले होते.

हेही वाचा – 

शिवडीमध्ये कार आणि ट्रकचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू ७ जखमी