घरमुंबईचक्क विधिमंडळातच प्रवचनाचं आयोजन! विरोधकांची टीका

चक्क विधिमंडळातच प्रवचनाचं आयोजन! विरोधकांची टीका

Subscribe

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाल्यानंतर पहिल्याच दिवशी विधान भवनाच्याच सेंट्रल हॉलमध्ये शिवानी बहन यांचे प्रवचन राज्य सरकारने ठेवले आहे. त्यावर विरोधक मोठ्या प्रमाणावर टीका करत आहेत.

राज्य विधी मंडळाच्या ऐतिहासिक अशा अर्थसंकल्पीय अधिवेशनास सोमवारपासून सुरुवात झाली खरी. पण राज्यपालांच्या अभिभाषणाप्रमाणे इतर अनेक गोष्टी या अधिवेशनात ऐतिहासिक ठरत असल्याने हे अधिवेशन अधिक चर्चेत आले आहे. अधिवेशनाच्या निमित्ताने सरकारकडून आमदारांसाठी थेट अध्यात्मिक प्रवचनाचे आयोजन केल्याने टिकेची झोड उठविली गेली आहे. विधी मंडळाच्या सेंट्रल हॉलमध्येच हे प्रवचन आयोजित केल्याने विरोधकांनी याविरोधात आक्रमक पवित्रा धारण केला आहे. तर हे प्रवचन अध्यात्मिक नसल्याचा दावा राज्य सरकारकडून वित्त मंत्री सुधीर मुनगटींवार यांनी पत्राकारांशी बोलताना केला आहे.

विधिमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्येच प्रवचन!

राज्य मंत्रीमंडळाच्या अखेरच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास सोमवारपासून मुंबईत सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यपालांच्या अभिभाषणावर विरोधकांनी बहिष्कार घातल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. अशा प्रकारची ही पहिलीच वेळ असल्याने यावरून दिवसभर उलट सुलट चर्चेला उधाण आले होते. ही चर्चा शांत होते न होते तोच राज्य सरकारने आयोजित केलेल्या कार्यक्रमावरुन विरोधकांनी आक्रमक पवित्रा धारण केल्याचे दिसून आले. राज्य सरकारच्या महाराष्ट्र विधीमंडळ सचिवालयातर्फे प्रजापिता ब्रम्हकुमारी विश्वविद्यालयाच्या शिवानी बहन यांच्या दिव्य संदेशात्मक प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे. एखाद्या अध्यात्मिक प्रवचनाचे विधी मंडळात आयोजन करण्याची ही पहिलीच वेळ असून हे प्रवचन थेट विधी मंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये आयोजित करण्यात आले आहे. राज्यात एकीकडे दुष्काळ आणि इतर प्रश्न भेडसावत असताना अशा प्रकारचे अध्यात्मिक संदेश देणारे प्रवचन आयोजित केल्याने विरोधकांनी याविरोधात रणशिंग फुंकले आहे.

- Advertisement -

‘तर मौलवींचे देखील प्रवचन ठेवा!’

दरम्यान, या अध्यात्मिक प्रवचनावर टीकेची झोड उठविताना राष्ट्रवादी काँग्रेससह, समाजवादी पक्ष आणि एमआयएमने देखील विरोध केला आहे. याविरोधात बोलताना समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी म्हणाले की, ‘सरकारचे दिवस भरल्यामुळे सरकार आपलं पाप लपवण्यासाठी धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करत आहे. या कार्यक्रमाला आम्ही उपस्थिती लावणार नाही. ज्या ठिकाणी हा कार्यक्रम घेतला जातोय तो अयोग्य आहे’. तर एमआयएमने देखील या कार्यक्रमाला विरोध दर्शविला आहे. ‘अशा अध्यात्मिक कार्यक्रमांना परवानगी असेल तर आम्ही आमच्या मौलवींना देखील आमंत्रित करुन त्यांचे देखील प्रवचन ठेवा’, असे मत एमआयएमचे वारिस पठाण यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -