घरमुंबईशिवसेना नगरसेवक भोईर यांना लाच घेताना अटक

शिवसेना नगरसेवक भोईर यांना लाच घेताना अटक

Subscribe

शिवसेना नगरसेवक कमलेश यशवंत भोईर यांना १० हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे.

शिवसेना नगरसेवक कमलेश यशवंत भोईर यांना १० हजार रुपयांची लाच घेताना काल, सोमवारी रात्री अटक करण्यात आली आहे. ठाणे लाचलुचपत विभागाकडून ही कारवाई करण्‍यात आली. कमलेश भोईरे यांना त्‍यांच्‍या कार्यालयामध्ये लाच घेताना पकडण्‍यात आले. कमलेश भोईर मीरा भाईंदर महानगर पालिका प्रभाग १५ चे शिवसेना नगरसेवक आहेत. काशिमीरा येथील मुन्शी कंपाऊंडजवळ सुरु असलेल्या बांधकामाकरिता २५ हजारांची लाच शिवसेनेचे नगरसेवक कमलेश भोईर यांनी मागितली होती. याप्रकरणी तक्रारदाराने ठाण्‍यातील एसीबीकडे तक्रार केली. या तक्रारीची नोंद घेत एसीबीने कमलेश भोईरे यांना लाच घेतान रंगेहात पकडण्‍यासाठी सापळा रचला. यामध्‍ये दहा हजार रुपयाची लाच घेताना कमलेश यांना अटक करण्‍यात आली.

काय आहे प्रकरण

तक्रारदार यांचे राहत्या घराच्या पोटमाळ्याचे बांधकाम चालू असून याकरता तक्रारदार यांनी मिरा भाईंदर महानगरपालिकेची परवानगी घेतले नाही. घराच्या पोटमाळ्याचे काम चालू ठेवायचे असल्यास २५ हजार रूपये द्यावे लागतील, अशी लाचेची मागणी नगरसेवक भोईर यांनी केली. तसेच पैसे न दिल्यास महानगरपालिका अधिकाऱ्यांना सांगून तक्रारदार यांचे राहते घराचे चालू असलेले पोटमाळ्याचे बांधकाम पाडून टाकू, असे सांगून तडजोडीअंती पहिला हप्ता म्हणून १० हजार रूपये लाचेची रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले. ही लाचेची रक्कम खासगी इसम यांच्याकडे देण्यास सांगून, आरोपी नं. २ खासगी इसम यांनी ही रक्कम आलोसे यांच्या सांगण्यावरून तक्रारदार यांच्याकडून स्विकारली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -