घरमुंबईशिवसेनेकडून मुंबईच्या महापौरपदी किशोरी पेडणेकर यांची नियुक्ती

शिवसेनेकडून मुंबईच्या महापौरपदी किशोरी पेडणेकर यांची नियुक्ती

Subscribe

मुंबईच्या महापौरपदी शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका किशोरी पेडणेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच उपमहापौरपदी सुहास वाडकर यांनी अर्ज दाखल केला आहे.

मुंबईच्या महापौरपदी शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका किशोरी पेडणेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेकडून त्यांनी महापौरपदाच्या उमेदवार म्हणून आज, सोमवारी अर्ज भरला आहे. किशोरी पेडणेकर या पालिकेतील ज्येष्ठ नगरसेविका असून त्यांनी पालिकेच्या विविध पदांवर काम केले आहे. तसेच उपमहापौरपदी सुहास वाडकर यांनी अर्ज दाखल केला आहे. येत्या २२ नोव्हेंबर रोजी महापौरपदाची निवडणूक होणार आहे.

मुंबई महापौरपदासाठी शिवसेनेतर्फे किशोरी पेडणेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. तर उपमहापौर पदाच्या नावावर अॅड. सुहास वाडकर यांच्यातर्फे अर्जदाखल करण्यात आला आहे. शिवसेनेच्या ज्येष्ठ आणि आक्रमक नगरसेवक म्हणून पेडणेकर यांची ओळख आहे. तर सुहास वाडकर हे महापालिकेच्या विधी समितीवर कार्यरत आहेत. मुंबई महापौरपदाचा प्रवर्ग खुला असल्याने त्या दृष्टीने शिवसेनेने लॉबिंग सुरू होती. काही नगरसेवकांनी वरिष्ठ पक्षश्रेष्ठींशी संपर्क करत महापौरपद पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न केला होता. महापौरपदासाठी शीतल म्हात्रे, बाळा नर, रमाकांत रहाटे, सुजाता पाटेकर, मंगेश सातमकर, यशवंत जाधव, विशाखा राऊत आदी नेत्यांचा सामावेश होता. मात्र, अखेर किशोरी पेडणेकर यांच्या नावे शिक्कामोर्तब झाले आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

‘कभी कभी लगता है अपुनही भगवान है’; राऊत संसदेत बरसले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -