घरमुंबईशिवसेनेचा 'प्रशांत किशोर'वर भरवसा नाय!

शिवसेनेचा ‘प्रशांत किशोर’वर भरवसा नाय!

Subscribe

प्रशांत किशोर यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर ते आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला शिवसेनेची डिजीटल रणनीती आखण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. परंतु, शिवसेनेचा प्रशांत किशोर यांच्यावर विश्वास नाही, असे शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने आपलं महानगरशी बोलताना सांगितलं आहे.

निवडणुकीमध्ये आपल्या आगळ्यावेगळ्या आणि परिणामकारक प्रचार मोहिमेसाठी ओळख असलेले प्रशांत किशोर यांनी बुधवारी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. प्रशांत किशोर यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर ते आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला शिवसेनेची डिजीटल रणनीती आखण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र आपलं महानगरला मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेचा असा कोणताही विचार नाही. ‘२०१४ ला मोदींना साथ देणारे, त्यानंतर नितीश कुमार यांना साथ देणारे आणि नंतर काँग्रेसला साथ देणाऱ्या प्रशांत किशोर यांच्यावर विश्वास तरी कसा ठेवायचा?’, असा प्रश्न सध्या शिवसेनेला पडला आहे. तसेच इकडून तिकडे उड्या मारणारे प्रशांत किशोर शिवसेनेसोबत तरी जास्त काळ राहतील का? असा सवाल शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने आपलं महानगरशी बोलताना उपस्थित केला. त्यामुळे शिवसेनेचा प्रशांत किशोरवर सध्यातरी ‘भरवसा नाय!’ असेच म्हणावे लागेल.

…म्हणून प्रशांत किशोर मातोश्रीवर

मातोश्रीवर एखाद्याने भेट मागितली तर त्याला वेळ देणे ही मातोश्रीची वर्षांनूवर्षे चाललेली परंपरा आहे. त्यामुळेच आज उद्धव ठाकरे प्रशांत किशोर यांना मातोश्रीवर भेटल्याचे या नेत्याने आपलं महानगरशी बोलताना सांगितले. तसेच सध्या शिवसैनिक आणि युवा सैनिक हे स्वतःच सोशल मीडियावर काम करत असल्याने प्रशांत किशोर शिवसेनेची डिजिटल रणनीती आखणार आहेत या निववळ अफवा असल्याचे या वरिष्ठ नेत्याने आपलं महानगरशी बोलताना सांगितले. तसेच काही शिवसेनेचे खासदार प्रशांत किशोर यांना मातोश्रीवर घेऊन आल्यामुळे आजची भेट नुसती अनौपचारिक झाल्याचे या नेत्याने सांगितले.

- Advertisement -

कोण आहे प्रशांत किशोर?

प्रशांत किशोर यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान नरेंद्र मोदी यांच्यासाठी काम केले होते. ‘चाय पे चर्चा’ सारखा हिट कार्यक्रम असो किंवा ‘अब की बार…’ सारख्या घोषणा या प्रशांत किशोर यांनी त्यावेळी आखलेल्या रणनीतीचाच भाग होता. त्यानंतर बिहार विधानसभा निवडणुकीत प्रशांत किशोर यांनी नितीश कुमार यांना साथ दिली होती. नितीश कुमार आणि लालूप्रसाद यादव एकत्र येण्यातही प्रशांत यांचा मोठा वाटा होता. यानंतर पंजाब आणि उत्तरप्रदेश विधानसभांच्या निवडणुकांसाठी प्रशांत किशोर यांनी राहुल गांधी यांच्यासोबत काम केले होते. तसेच २०१४ साली लोकसभा निवडणुकीत भाजपसाठी निवडणूक रणनितीकार म्हणून काम केल्यानंतर प्रशांत किशोर हे नितीश कुमार यांच्या संपर्कात आले. २०१५ साली बिहारमधील विधानसभा निवडणुकीत त्यांनी जेडीयूसाठी रणनिती आखली. ‘बिहार में बाहर हो, नितीश कुमार हो’ ही घोषणादेखील प्रशांत किशोर यांच्याच कल्पनेतील आहे.

किशोर यांची केवळ सदिच्छा भेट असल्याने ते शिवसेनेची प्रचार रणनीती सांभाळणार असल्याची चर्चा केवळ माध्यमांमध्येच आहे, त्याबाबत कुठलाही निर्णय झालेला नाही. पक्षात प्रचाराची धुरा सांभाळण्याची जबाबदारी नेहमी शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे असते. शिवसेना नेहमीच आपली रणनिती ठरवत असते. युतीसाठी आम्हाला कुठल्याही मध्यस्थाची गरज नाही, हा काही व्यापार नाही. उद्धव ठाकरे प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यायला सक्षम आहेत. हळूहळू आपल्याला सर्वकाही कळेल.
– संजय राऊत, खासदार शिवसेना

हेही वाचा – हा तर ममता विरुद्ध मोदी असा ‘सामना’ – शिवसेना

शिवसेनाभाजपचा मित्रपक्ष आहे. राज्यात आणि केंद्रात आमची सत्ता आहे. प्रशांत किशोर हे जर शिवसेनेला मदत करत असतील तर ती चांगली गोष्ट असून, ती अप्रत्यक्षरित्या भाजपलाही होणारी मदतच असेल.
– सुधीर मुनगंटीवार, वनमंत्री
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -