घरमुंबईसुभाष देसाईंना बदनाम केल्याप्रकरणी शिवसेनेची तक्रार दाखल

सुभाष देसाईंना बदनाम केल्याप्रकरणी शिवसेनेची तक्रार दाखल

Subscribe

निदर्शकांनी वाशीत आंदोलन करताना मंत्री सुभाष देसाई यांचे फोटो असलेले फलक हातात घेतले होते. ते फोटो रस्त्यावर टाकून जाणीवपूर्वक तुडवले गेले आणि अर्वाच्य शब्दात घोषणा दिल्या गेल्या, असा आरोप शिवसेनेच्या निवेदन पत्रात करण्यात आले आहेत.

एमआयडीसीच्या जागेवर अनधिकृतपणे बावखळेश्वर मंदिर उभारले आहे. या मंदिरावर तडक कारवाई करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. मात्र उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी मंदिर नियमितीकरणाचे धोरण जाणीवपूर्वक आणि राजकीय द्वेषापोटी बदलल्याचा आरोप धार्मिक स्थळे बचाव समितीने करून त्याविरोधात वाशी येथे आंदोलन केले होते. या विरोधात वाशी पोलीस स्थानकात निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली. तसेच कारवाई केली गेली नाही तर आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे.

काय आहे निवेदनात?

निदर्शकांनी वाशीत आंदोलन करताना मंत्री सुभाष देसाई यांचे फोटो असलेले फलक हातात घेतले होते. ते फोटो रस्त्यावर टाकून जाणीवपूर्वक तुडवले गेले आणि अर्वाच्य शब्दात घोषणा दिल्या गेल्या, असं आरोप पत्रात करण्यात आला आहे. तसेच आंदोलन करण्याआधी पोलीस परवानगी घेणे गरजेचे असते. मात्र ती घेतली गेली नसल्याचे पत्रात म्हटले आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. सुभाष देसाई हे मंत्री आहेत त्यामुळे महाराष्ट्र शासनाची आणि शिवसेनेची जाणीवपूर्वक बदनामी करण्यात आली आहे. मंदिरावर होणारी तोडक कारवाई ही सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशाने होणार आहे. जमाव जमवून आंदोलने करण्यासाठी सिडकोचे कर्मचारी असलेले निलेश तांडेल आणि इतर ४ व्यक्ती कारणीभूत असल्याचा आरोप शिवसेनेने पत्रात केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – राममंदिर… शिवसेना तसेच भाजपचं

Chetan Patilhttps://www.mymahanagar.com/author/chetan/
writer, poet, journalist, copy writer, theater artist
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -