Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई गिरीश महाजनांना शिवसेनेचा टोला, खंडणी प्रकरणात सडेतोड उत्तर

गिरीश महाजनांना शिवसेनेचा टोला, खंडणी प्रकरणात सडेतोड उत्तर

Related Story

- Advertisement -

खंडणी प्रकरणात भाजप नेते गिरीश महाजन यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण राजकीय षडयंत्राचा भाग असल्याचा दावा गिरीश महाजन यांनी केला आहे. या प्रकरणामुळे गिरीश महाजन यांच्या अडचणीत भर पडली आहे. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी मात्र गिरीश महाजन यांना खंडणी प्रकरणात चांगलेच कोंडीत पकडले आहे. कर नाही त्याला डर कशाला ? असा सवाल सावंत यांनी केला आहे.

राजकीय षडयंत्र असेल आणि महाजन यांनी केले नसेल, तर त्यांनी घाबरून जाऊ नये, अशा शब्दातच अरविंद सावंत यांनी भाजपच्या नेत्यांच्या भाषेतच त्यांच्यावर पलटवार केला आहे. महाजनांवर खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याचे मी एेकून आहे, ही पोलिसांची कारवाई आहे असे कळाले. पोलिसांची कारवाई असेल तर चौकशी तर होणारच. कर नाही तर डर कशाला ? हे आपल्या नेत्याचेच वाक्य महाजन यांनीही लक्षात ठेवावे असा टोमणा सावंत यांनी महाजनांना मारला. जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या संचालकांमध्ये वाद आहे. गिरीश महाजन यांनी मंडळाच्या संचालकांना डांबून ठेवून मारहाण करत पाच कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणात कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस या प्रकरणात आणखी तपास करत आहेत.

- Advertisement -

भाजप नेत्यांनी आतापर्यंत महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर झालेल्या ईडी कारवाईच्या निमित्ताने आरोप केले आहेत. प्रामुख्याने किरीट सोमय्या यांच्या विधानाची आठवण करून दिली. अनेक बिनबुडाचे आरोप सोमय्या यांनी केले, त्याचे पुढे काय झाले असा सवाल त्यांनी केला. सोमय्या यांनी ज्यांच्यावर आरोप केले त्याचे पुढे काय झाले असा सवालही त्यांनी केला.


 

- Advertisement -

 

 

 

 

 

 

- Advertisement -