घरमुंबईफेव्हिकॉल का जोड,अमित शाह यांच्यासाठी उद्धव ठाकरे गांधींनगरला!

फेव्हिकॉल का जोड,अमित शाह यांच्यासाठी उद्धव ठाकरे गांधींनगरला!

Subscribe

अमित शाह यांच्यासाठी उद्धव निघाले गांधींनगरला!

भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले केले. मात्र सत्तेसाठी सेना-भाजपने युती करत हेवेदावे विसरले. आता तर ही युती अधिकच बळकट होणार आहे. कारण अमित शहा गांधीनगर, गुजरातमधून उमेदवारी अर्ज भरताना उद्धव ठाकरे त्यांच्यासोबत उपस्थित रहाणार आहेत. शनिवारी उद्धव ठाकरे आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर हे गांधीनगरला सकाळी रवाना होत असून ते शहा यांच्यासोबत प्रचार सभा आणि रॅलीमध्येही सहभागी होणार आहेत.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना गुजरातच्या गांधीनगर येथून उमेदवारी जाहीर झाली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा पत्ता कापून शहा यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे शनिवारी गुजरातच्या गांधीनगर लोकसभा मतदार संघातून शहा हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उद्धव ठाकरेंनी आपला उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळेत उपस्थित राहावे अशी अमित शहा यांनी इच्छा व्यक्त केली होती. तसेच उपस्थित राहण्याचे आमंत्रणही दिले होते. शहा हे उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी अहमदाबादमध्ये शक्तीप्रदर्शन करणार आहेत. यासाठी चार किलोमीटरची रथयात्रा काढण्यात येणार आहे. ही रथयात्रा नरेनपुरा विधानसभा मतदारसंघापासून निघणार आहे. या रथयात्रेत गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी आणि अन्य वरिष्ठ नेते उपस्थित राहणार असल्याचीही माहिती मिळत आहे मागील लोकसभा निवडणूक एकत्र लढल्यानंतर युती तुटली होती. त्यामुळे त्यानंतरची विधानसभा निवडणूक आणि महापालिका निवडणूक शिवसेना आणि भाजपने स्वतंत्रपणे लढली होती. त्यावेळी सेना, भाजपने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपही केले होते. परंतु एकमेकांवर आरोप करणारे हे दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र आले.

- Advertisement -

शिवसेना-भाजप युती पुन्हा होण्यासाठी अमित शाह यांनी महत्वपूर्ण भूमिका निभावली होती. त्यासाठी त्यांनी ’मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरे यांची मनधरणी केली होती. त्यांच्या या प्रयत्नाला यश येऊन युतीची अधिकृत घोषणा त्यांनी केली होती. ‘एनडीए’ मध्ये एक संदेश जावा यासाठी हा प्रयत्न असला तरी अडवाणी यांचा पत्ता कापल्याने एक प्रकारची भाजप कार्यकत्यांमध्ये जी नाराजी आहे ती उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीने कमी होईल याच हेतूने शहा यांनी उद्धव यांना उमेदवारी अर्ज भरताना उपस्थित राहण्याची गळ घातली होती.

शनिवारी सकाळी ८ वाजता शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यासह उद्धव ठाकरे एका खासगी विमानाने गुजरात-अहमदाबादला रवाना होणार आहेत.त्यानंतर सकाळी साडेनऊ वाजता गांधी नगर येथील जाहिर सभेत उध्दव ठाकरे यांचे भाषण होईल, असे बोलले जात आहे. त्या सभेनंतर दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यासोबत उमेदवारी अर्ज दाखल करतील,अशीही माहिती मिळत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -