घरमुंबईमाता न तू वैरिणी; मस्ती करते म्हणून मुलीला साखळीने बांधले

माता न तू वैरिणी; मस्ती करते म्हणून मुलीला साखळीने बांधले

Subscribe

चिमूरडी मस्ती करते म्हणून तिला साखळीने बांधण्यात आल्याचा प्रकार मुंबईतील सायन परिसरात उघडकीस आला आहे.स्थानिकांनी केलेल्या तक्रारी नंतर या मुलीला मुक्त करण्यात आले.

लहान मुले म्हणजे देवाची फुले असतात. ‘देशात बेटी बचाओ बेटी पढाओ’ मोहिम एकीकडे सुरु आहे. मात्र तरीही देशातील चिमुरड्यांचा छळ करण्यात येत असल्याचे चित्र बघायला मिळते. मस्ती करते म्हणून एका चिमुरडीला तिच्याच आईने साखळीने बांधून ठेवल्याचा व्हिडिओ सोशली मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ कोणत्या ग्रामीण भागातला नसून चक्क मुंबईतला आहे. मुंबईतील सायन कोळीवाडा परिसरातील हा व्हिडिओ असल्याची माहिती समोर आली आहे. जनावराप्रमाणे या मुलीला बांधण्यात आले असल्याचे या व्हिडिओतून दिसून आले आहे.

भाजप आमदार तारासिंग यांचा मुलगा रजनीत सिंग याने या चिमूरडीची सुटका केली आहे. पीडित चिमूरडी आपल्या आई वडिलांबरोबर सायन कोळीवाडा परिसरातील एका झोपडीत राहते. याच ठिकाणी असलेल्या एका पालिका शाळेत तीसरीत ती शिकते. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांची तळ पायाची आग मस्तकात गेली आहे.

- Advertisement -

व्हिडिओ पाण्यासाठी क्लिक करा – 

मुलीला साखळीने बांधून ठेवण्याचा संतापजनक प्रकार

'बेटी बचाओ, बेटी पढाओ' असा नारा सरकारने दिला. मात्र मुंबईतील एका क्रूर मातेने स्वतःच्या मुलीला साखळीने बांधून ठेवण्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय.

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Wednesday, February 20, 2019

- Advertisement -

“सायन कोळीवाडा परिसरातील रस्त्यावरून जात असताना ही चिमुरडी येथे रडतांना दिसली. या चिमुरडीच्या पायाला साखळीने बांधले होते. चिमुरडीच्या आईने तिला बांधले होते. साखळीने बांधण्याचे कारण विचारले असता मुलगी मस्ती करते हे कारण आईकडून सांगण्यात आले. लहानमुले मस्ती करतात म्हणून त्यांना शेळ्या मेंढ्यांसारखे बांधणे चुकीची गोष्ट आहे. मुलीला साखळीतून मुक्त करण्यासाठी मी सांगितले. संबधीत व्हिडिओ हा काल सकाळी काढण्यात आला. आज सकाळी त्या ठिकाणी गेलो असल्यास मुलगी मुक्त असल्याचे मला दिसले. यापुढे मुलगी साखळीत दिसली तर पोलिसांकडे तक्रार नोंदवण्यात येत असल्याची ताकीद या चिमुरडीच्या आईला देण्यात आली आहे.” – रजनीत सिंग 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -