घरमुंबईरेशनच्या तांदळात कुजलेली पाल!

रेशनच्या तांदळात कुजलेली पाल!

Subscribe

माथेरान मधील धक्कादायक प्रकार

येथील स्वस्त धान्य दुकानातून घेतलेल्या तांदळात मरून कुजलेल्या अवस्थेतील पाल आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे सरकार आमच्या जीवाशी खेळत आहे, असा संताप स्थानिक जनतेकडून व्यक्त केला जात आहे.

सर्व सामान्यांसाठी महसूल विभागाची शहरात 3 स्वस्त धान्य दुकाने आहेत. त्यातील गजानन अबनावे यांच्या स्वस्त धान्य दुकान क्रमांक 2 मध्ये बुधवार आणि गुरुवारी गहू, तांदूळ, तूरडाळ, चणाडाळ याची विक्री सुरू होती. त्यामध्ये शिधा पत्रिकाधारक धाकू गोरे या आदिवासी गृहस्थाने 5 माणसांच्या नावे 15 किलो तांदूळ आणि त्याची पावती घेतली. घरी गेल्यानंतर त्यांना तांदळात मेलेली पाल सडलेल्या अवस्थेत आढळली.

- Advertisement -

गोरे यांनी पुन्हा दुकान गाठून सर्व प्रकार दुकानदाराला सांगितला. अबनावे यांनी ते तांदूळ बाजूला ठेऊन दुसर्‍या गोणीतील तांदूळ त्यांना दिले. ही माहिती माथेरानकरांच्या निदर्शनास आल्यानंतर अनेकांकडून तीव्र भावना व्यक्त करण्यात आल्या. शासन गरीब जनतेच्या जीवाशी खेळत असल्याने या प्रकाराची चौकशीचीही मागणी करण्यात आली.

माझे माथेरानमध्ये रास्त भाव धान्य दुकान असून, मी बुधवारपासून शिधा पत्रिकाधारकांना शासन नियमानुसार धान्य देत असताना धाकू गोरे या शिधा पत्रिकाधारकास दिल्या गेलेल्या तांदळामध्ये मेलेली पाल सापडली. ते तांदूळ बाजूला ठेवून दुसरे तांदूळ देण्यात आले.
-गजानन अबनावे, दुकानदार

- Advertisement -

शिधा पत्रिका दाखवून मी शासनमान्य धान्य दुकानातून तांदूळ घेतले. घरी जाऊन पाहतो तर त्यामध्ये मेलेली पाल कुजलेल्या अवस्थेत आढळली. या अगोदरसुद्धा उंदराच्या लेंड्या आढळल्या होत्या. त्यामुळे शासन आमच्या जीवाशी खेळत आहे. हे धान्य गोणीत सील करताना ते कसे आहे हे अधिकारी पडताळून पाहतात की नाही? ही बाब खूप गंभीर असून वरिष्ठ पातळीवर याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे.
-धाकू गोरे, शिधा पत्रिकाधारक

तांदळाच्या गोणीमध्ये कुजलेल्या अवस्थेतील पाल आढळली हे ऐकून धक्का बसला. हे धान्य आम्ही एफ. सी. आय. कळंबोली, नवी पनवेल येथून सीलबंद गोणी घेऊन त्या त्याच अवस्थेत रास्त भाव दुकानदारांना वितरित करतो. त्यामुळे मेलेली पाल तांदळाच्या गोणीत कशी गेली, हा संशोधनाचा विषय आहे.
-दिनेश गुजराथी, धान्य वितरण अधिकारी, कर्जत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -