घरमुंबईशताब्दी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार; मनसेने आणला उघडकीस

शताब्दी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार; मनसेने आणला उघडकीस

Subscribe

मालाड दुर्घटनेतील एका रुग्णावर उपचार केल्यानंतर त्यांना घरी सोडून देण्यात आले होते. मात्र, या रुग्णाला पुन्हा त्रास होऊ लागल्याने त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल केले असता रुग्णाच्या पायात चक्क दोन इंचाची काच आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

मालाड दुर्घटनेने त्यांच्याजवळून त्यांच्या हक्काचे घर हिरावून घेतल्याने अगोदरच नियतीने त्यांच्यावर घाला घातला आहे. पण त्यानंतरही त्यांची चिंता संपत नसल्याची चिन्हे दिसून आली आहेत. मालाड दुर्घटनेतील एका रुग्णावर उपचार केल्यानंतर घरी सोडून देण्यात आले होते. या रुग्णाच्या पायात चक्क दोन इंचाची काच आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी उघडकीस आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हा प्रकार उघडकीस आणला असून हॉस्पिटलच्या या निष्काळजीपणविरोधात संताप व्यक्त केला जात आहेत. संबंधित प्रकरणात दोषी असणार्‍या डॉक्टारांविरोधात कठोर कारवाईची मागणी जोर धरु लागली असून अन्यथा येत्या काळात जनआंदोलन उभारण्यात येणार असल्याचा इशारा मनसेच्या शालिनी ठाकरे यांनी शनिवारी दिला आहे.

उपचार केलेल्या रुग्णाच्या पायात दोन इंचाची काच

मालाड दुर्घटनेत जखमी झालेल्या १०० हून अधिक रुग्णांनांवर शताब्दी रुग्णालयात उपचार करण्यात आले. यापैकी एक रुग्ण म्हणजे सोनू कनोजिया. सोनूवर रुग्णालयात १५ दिवसांच्या उपचारानंतर घरी पाठवण्यात आले. पण ज्यांचे घरच वाहून गेलं आहे ते जाणार कुठे? मनसेचे उपशाखाध्यक्ष उपशाखाध्यक्ष झाकीर शेख त्यांना आपल्या घरी घेऊन गेले. मात्र, दोनच दिवसांत सोनू यांना होणाऱ्या असह्य वेदना पाहून शेख यांनी कनोजियांना जवळच्याच एका खासगी रूग्णालयात दाखल केले. त्या खासगी रूग्णालयातील डॉक्टरांनी सोनू कनोजिया यांच्या पायातून दोन इंच लांबीची काच बाहेर काढली. सोनू कनोजिया यांना आलेला रूग्णालयाचा अनुभव शालिनी ठाकरे यांनी सर्वांसमोर मांडला. ही बाब धक्कादायक तर आहेच, पण त्याहून महत्वाचे म्हणजे महापालिकेच्या रूग्णालयात केल्या जाणाऱ्या उपचारांबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. दुर्घटनेत जखमी झालेल्यांना लवकरात लवकर डिस्चार्ज देण्यासाठी रूग्णालय प्रशासन अनाठायी आग्रह धरत होते. त्यामुळे अनेक जखमींवर पुरेसे उपचार झालेलेच नाहीत, याकडे रूग्णालयाचे अधिष्ठाता म्हणून आपण दुर्लक्ष करू शकत नाही, असे मत शालिनी ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.

- Advertisement -

मालाड दुर्घटनावासियांची चिंता संपेना

सोनू कनोजिया यांच्यावर रूग्णालयात नेमके कोणते उपचार केले गेले? त्यांच्या पायातली काच महापालिकेच्या या रूग्णालयातील डॉक्टरांना का दिसली नाही? सोनू कनोजिया यांच्याप्रमाणे इतरही काही रूग्णांवर अपुरे किंवा अयोग्य वैद्यकीय उपचार केले गेले का? ज्या जखमींचा रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यांच्यातील काहीजणांच्या मृत्यूला डॉक्टरांचा किंवा वैद्यकीय अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा तर कारणीभूत नाही ना? अशा अनेक प्रश्नांची मनसेच्या शिष्टमंडळाने अधिष्ठात्यांवर सरबत्ती केली आणि जाब विचारला आहे.

शताब्दी रूग्णालयाविरोधात आंदोलन करु

भविष्यात रूग्णांवरील वैद्यकीय उपचारांबाबत पुरेशी काळजी घेतली जावी, यासाठी आपण तत्काळ नव्याने नियमावली बनवून तिची अंमलबजावणी करावी, तसेच सोनू कनोजिया यांच्यावरील उपचारांमध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरांवर आपण कठोरात कठोर कारवाई करावी, ही आमची तुमच्याकडे अत्यंत आग्रहाची मागणी आहे. या मागण्यांची पूर्तता न झाल्यास शताब्दी रूग्णालयाविरोधात आंदोलन करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय आमच्याकडे राहणार नाही, अशा शब्दांत शालिनी ठाकरे यांनी रूग्णालय प्रशासनाला इशारा दिला. दरम्यान, याप्रश्नी शनिवारी मनसेच्या शिष्टमंडळाने शताब्दी रुग्णालय प्रशासनाची भेट घेत याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली.

- Advertisement -

पश्चिम उपनगरात कूपर रुग्णालय आणि बाळासाहेब ठाकरे रुग्णालय सोडता पालिका रुग्णालय नाही. त्यामुळे शताब्दी रुग्णालयावर अतिरिक्त ताण पडत आहे. डॉ. प्रदीप आंग्रे, शताब्दी रूग्णालय अधिष्ठाता


हेही वाचा – शताब्दी हॉस्पिटलात उभारणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -