घातक रंग आढळल्यास दुकानदारावर कारवाईचा बडगा

होळी आणि धुलीवंदन सणासाठी कल्याण रिजनमध्ये सुमारे ७०० पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तसेच घातक रंग आढळल्यास दुकानदारावर देखील धडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रताप दिघावकर यांनी दिली आहे.

Mumbai
selling Dangerous color
घातक रंग आढळल्यास दुकानदारावर कारवाईचा बडगा

होळी आणि धुलीवंदन सणासाठी कल्याण रिजनमध्ये सुमारे ७०० पोलीस तैनात ठेवण्यात आले आहे. घातक रंग आढळल्यास आणि त्याचा त्रास नागरिकांना झाल्यास संबधित दुकानादारावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात येईल, असा इशारा अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. प्रताप दिघावकर यांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना दिली आहे. तरुणींना आणि महिलांना पाण्याने तसेच रंगाने भरलेले फुगे मारून वेठीस धरले जाते. त्यांच्यावरही पेालिसांची करडी नजर राहणार असून प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक टीम तैनात असणार आहे, असेही दिघावकर यांनी सांगितले आहे.

होळी, धुलीवंदनसाठी ७०० पोलीस तैनात

निवडणुकीची धामधूम सुरू झाली असतानाच होळी आणि धुलीवंदन सणही आला आहे. त्यामुळे पोलिसांवर अधिकच ताण आहे. कल्याण रिजनमध्ये १६ वरिष्ठ पोलीस निरीक्षक ३० पोलीस निरीक्षक आणि ७०० पोलीस एसआरपी तुकडी आदींचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत १ पोलीस उपनिरिक्षक ५ कॉन्स्टेबल आणि २ महिला पोलीस आणि दोन गाडया अशी टीमही तैनात असणार आहे. शहरातील प्रमुख आठ पॉईंटवर नाकाबंदी असणार आहे. प्रत्येक वाहनांची कडक तपासणी केली जाणार आहे. तसेच ड्रंक ड्राईव्ह रस्त्यावर बिभित्स वर्तन करणे आदींवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. महिलांना, मुलींना पाण्याने, रंगाने भरलेले फुगे मारून वेठीस धरले जाते. त्यांच्यावरही पेालिसांची करडी नजर राहणार आहे. घातक रंगामुळे अनेकवेळा त्वचेवर जखमा होतात. त्यामुळे दुकानदारांनी घातक रंग विक्री करू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे. रंगाचा बेरंग होणार नाही याची काळजी घेऊन हा सण साजरा करावा, असे आवाहनही दिघावकर यांनी केले आहे.


वाचा – मोबाईल पाण्यात पडल्यास काय कराल?

वाचा – केमिकलयुक्त रंगांऐवजी घरीच तयार करा ‘नैसर्गिक रंग’!


 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here