BMC : स्थापत्य शहर समितीवर श्रद्धा जाधव तर ‘उपनगरे’वर श्रीकांत शेट्ये

मुंबई महापालिकेच्या चार वैधानिक समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर बुधवारपासून विशेष समित्यांच्या निवडणुकांना सुरुवात झाली. यामध्ये पार पडलेल्या स्थापत्य शहर समिती अध्यक्ष पदासाठी माजी महापौर श्रद्धा जाधव आणि स्थापत्य उपनगरे समिती अध्यक्षपदी श्रीकांत शेट्ये यांनी निवड झाली आहे.

मुंबई महापालिकेच्या स्थापत्य शहर समिती, स्थापत्य उपनगरे समिती अध्यक्ष पदाची निवडणूक महापलिका सभागृहात पार पडली. स्थापत्य शहर समिती अध्यक्ष पदासाठी शिवसेनेच्या वतीने माजी महापौर श्रद्धा जाधव आणि भाजपच्या वतीने सुरेखा लोखंडे निवडणूक रिंगणात होते. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या १५ मिनिटांत कोणीही अर्ज मागे न घेतल्याने या दोघांमध्ये ही निवडणूक पार पडली. यावेळी पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत समाजवादी पक्ष व राष्ट्वादी काँग्रेसच्या सदस्यांनी सेना उमेदवाराला मतदान केले. त्यामुळे तर काँग्रेसने उमेदवार न देता तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सर्वाधिक मतदान झाल्याने सेनेच्या उमेदवार श्रद्धा जाधव यांना पिठासीन अधिकारी महापौर किशोरी पेडणेकर यांनी विजयी घोषित केले.

स्थापत्य उपनगरे समिती अध्यक्ष पदासाठी शिवसेनेच्या वतीने श्रीकांत शेट्ये आणि भाजपच्या वतीने सागर सिंह ठाकूर हे निवडणूक रिंगणात होते. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या १५ मिनिटांत कोणीही अर्ज मागे न घेतल्याने या दोघांमध्ये ही निवडणूक पार पडली. यावेळी पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत समाजवादी पक्ष व राष्ट्वादी काँग्रेसच्या सदस्यांनी सेना उमेदवाराला मतदान केले. त्यामुळे तर काँग्रेसने उमेदवार न देता तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सर्वाधिक मतदान झाल्याने सेनेचे उमेदवार श्रीकांत शेट्ये यांना पिठासीन अधिकारी उपमहापौर सुहास वाडकर यांनी विजयी घोषित केले. विजयी झाल्यानंतर शेट्ये यांनी निळ्या रंगाची पुणेरी पगडी परिधान केली. आजवर सेनेचे सर्व नगरसेवक भगवे फेटे किंवा भगवी पगडी परिधान केल्याचे पाहिले असले सेनेच्या या नगरसेवकाने निळी पगडी परिधान करत वेगळे प्रतिबिंब उमटले आहे. विशेष म्हणजे या नगरसेवकाची वर्णी उपमहापौर पदावर लावण्यात येणार होती. परंतु त्यांनी नकार दिल्याने त्यांच्या या प्रामाणिक पणाचे हे बक्षीस पक्षाने त्यांना दिले असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा –

६ डिसेंबर रोजी चैत्यभूमी, शिवाजी पार्कवर जमण्याबाबत रामदास आठवलेंचे मोठं वक्तव्य