घरमुंबई'श्रावणीने अभ्यास करावा यासाठी पालकांनी लावले होते घराला टाळे'

‘श्रावणीने अभ्यास करावा यासाठी पालकांनी लावले होते घराला टाळे’

Subscribe

आग लागवल्यावर श्रावणीच्या घरा बाहेर पडता आले नाही कारण तिच्या घराला बाहेरुन टाळा लावलेला होता. पोलीस तपासामधून ही माहिती समोर आली आहे

दादर पोलीस वसाहतीतील इमारतीला लागलेल्या आगमध्ये एका १५ वर्षाच्या मुलीचा दुर्देवी मृत्यू झाला होता. या आग प्रकरणामध्ये एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या आगीमध्ये श्रावणी चव्हाण या १५ वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला होता. आग लागवल्यावर श्रावणीच्या घरा बाहेर पडता आले नाही कारण तिच्या घराला बाहेरुन टाळा लावलेला होता. दरम्यान, पोलीस तपासामधून ही माहिती समोर आली आहे की, श्रावणीला घरी ठेवून तिचे आई वडील घराला टाळे लावून लग्नासाठी निघून गेले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘घराला आग लागली त्यावेळी श्रावणी चव्हाण ही घरामध्ये झोपली होती. आग लागल्यानंतर तिला सुरक्षितरित्या घराबाहेर पडता आले नाही कारण तिच्या घराला बाहेरुन टाळे लावले होते. रविवारी श्रावणीचे आई-वडील लग्नासाठी गेले होते. श्रावणीने घरात बसून अभ्यास करावा यासाठी तिच्या आई-वडिलांनी घराला टाळे लावले होते.’

- Advertisement -

रविवारी दुपारी पावणे दोनच्या सुमारास दादर येथील पोलीस वसाहतीतील एका इमारतीला आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली होती. आगीची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवली. या आगीमध्ये ४ घरांचे मोठे नुकसान झाले होते. अग्निशमन दलाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, अशोक चव्हाण यांच्या घराला आग लागली होती मात्र त्याचे घराला बाहेरुन टाळे लावले होते. तसंच, त्याच्या घरामध्ये रिकामे रॉकेलचे कॅन्ड सुध्दा सापडले होते.

अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घराचे टाळे तोडून घरामध्ये प्रवेश केला असता श्रावणी चव्हाण ही जखमी अवस्थेत दिसली. श्रावणीला ताबडतोब सायन हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले. श्रावणीचे वडील वाकोला पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. आगीमध्ये त्यांच्या घराचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचसोबत त्याच्याशेजारी असलेल्या ४ घरांचे सुध्दा नुकसान झाले आहे.

- Advertisement -

दरम्यान, पोलिसांनी एसीमध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळे आग लागल्याचा संशय देखील व्यक्त केला आहे. मात्र, चव्हाण यांच्या घरामध्ये रॉकेलचा डबा सापडला आहे. त्यामुळे नेमकी आग कशामुळे लागली याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरु आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -