घरताज्या घडामोडीSion Hospital चा प्रताप; मृत रुग्णाची किडनी चोरुन भलत्यालाच सोपवला मृतदेह!

Sion Hospital चा प्रताप; मृत रुग्णाची किडनी चोरुन भलत्यालाच सोपवला मृतदेह!

Subscribe

कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर सायन रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांचे मृतदेह उपचार घेणाऱ्या इतर रुग्णांच्या शेजारी ठेवल्यामुळे टिकेचे धनी ठरलेल्या सायन रुग्णालयाचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. एका तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर त्याची किडनी काढून घेण्यात आली. तसेच याची भनक नातेवाईकांना लागल्यानंतर तरुणाचा मृतदेह परस्पर दुसऱ्याला देऊन टाकण्यात आला. या गंभीर प्रकरणाची तक्रार पोलीस स्थानकात देण्यात आली आहे. मृताच्या नातेवाईंकानी आवाज उचलल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने मृतदेह बदलल्याची चूक मान्य केली आहे. मात्र किडनी काढल्याचा आरोप रुग्णालयाने फेटाळून लावला आहे.

किडनीजवळच्या टाक्यांमुळे आला संशय!

अंकुश सुरवाडे (वय २७) या तरुणाचा २८ ऑगस्ट रोजी मुक्त द्रुतगती मार्ग येथे अपघात झाला. ज्यानंतर अंकुशला उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र गंभीर दुखापत झाल्यामुळे १४ दिवस उपचार केल्यानंतरही त्याचा १३ सप्टेंबर रोजी पहाटे ३ वाजता मृत्यू झाला. अंकुशच्या मृत्यु झाल्याचे कळताच नातेवाईक आणि मित्र मंडळींनी रुग्णालयात धाव घेतली, दरम्यान अतिदक्षता विभागात मृतदेह बघण्यासाठी गेलेले नातेवाईक आणि मित्राच्या लक्षात आले की, अंकुशच्या किडनीजवळ शस्त्रक्रिया करून त्या ठिकाणी टाके मारण्यात आले होते. ही बाब रुग्णालयातील डॉक्टरांच्या लक्षात आणून दिल्यानंतर नातेवाईकानी संबंधित डॉक्टरांना याबाबत जाब विचारला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याचा आरोप अंकुशच्या नातेवाईक आणि मित्रमंडळी केला आहे.

- Advertisement -

दोन तासात झाला मृतदेह गायब

अंकुशचा मृतदेह रुग्णालयातील शवागृहात पाठवण्यात आला होता, दोन तासापूर्वी आम्ही मृतदेह बघून आलो होतो, दोन तासानी अंकुशचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी गेलो असता अंकुशचा मृतदेह चुकून दुसऱ्याला दिला गेला, व त्या मृदेहावर अंत्यसंस्कार देखील करण्यात आले असल्याचे शवगृहातून सांगण्यात आले असल्याचा आरोप मृत अंकुशची मानलेली बहीण संजना चव्हाण हिने पत्रकारांशी बोलताना केला. माझ्या भावाची किडनी काढण्यात आली होती असा देखील आरोप संजना चव्हाण यांनी केला आहे. या धक्कादायक प्रकारची जाब विचारण्यासाठी भाजपचे आमदार कॅप्टन सेलवन यांनी कार्यकर्तेसह लोकमान्य टिळक रुग्णलायत धाव घेऊन रुग्णालयाचे अधिष्ठाता याची भेट घेऊन या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

सायन रुग्णलयाने किडनी काढून मृतदेह दुसऱ्याला दिला? आरोप | Shocking: Sion Hospital Kidney Racket

सायन रुग्णालयाने अंकुश सुरवाडे या २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर त्याची किडनी काढल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. यानंतर कहर म्हणजे या तरुणाचा मृतदेह नातेवाईक ताब्यात घेणार त्याआधीच रुग्णालयाने मृतदेह दुसऱ्याच नातेवाईकांना दिला. त्यांनी त्यावर अंत्यसंस्कारही केले. या प्रकारानंतर संतापलेल्या नातेवाईकांनी स्थानिक पोलीस स्टेशनला याबाबतची तक्रार दाखल केली आहे. तसेच रुग्णालयाने किडनी चोरीचा आरोप फेटाळून लावला आहे. मात्र मृतदेहाची अदलाबदल झाली असल्याचे मान्य केले असून त्याबाबत दोन कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Monday, September 14, 2020

- Advertisement -

नातेवाईकांनी मोबाईलवर काढला व्हिडिओ

या प्रकारानंतर भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांनी सांगितले की, “अपघात झालेला अंकुश या तरुणाच्या डोक्याला मार लागला होता. विभागातील तरुणांनी त्याला सायन रुग्णालयात दाखल केले होते. मी सायनच्या डिनशी बोलून योग्य उपचार देण्यासाठी बोललो होतो. मात्र नातेवाईकांनी ज्याप्रकारे मोबाईलवर व्हिडिओ काढलाय त्यात कमेरावर ऑपरेशन केल्याचे स्पष्ट दिसत आहे. आता या प्रकाराची पोलिसांनी चौकशी करावी. तसेच एका वृद्धाच्या जागी २७ वर्षीय तरुणाचा मृतदेह कसा काय दिला जाऊ शकतो? असाही प्रश्न निर्माण होतो.”

यानंतर सायन रुग्णालयाकडून एक पत्रक काढण्यात आलेले आहे. ज्यामध्ये त्यांनी मृतदेह अदलाबदल झाल्याची चूक मान्य केली असून याला जबाबदार असणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करुन पुढील चौकशी सुरु केल्याचे सांगितले.

sian hospital clearification
सायन रुग्णालयाकडून चूक मान्य
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -